नाशिक नाशिकच्या कापड बाजार परिसरात पुरातन श्री मुरलीधर मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव Shri Krishna Janmotsav सुरू आहे. दहा दिवसांच्या उत्सव काळात मुरलीधर मंदिरात Shri Muralidhar Temple श्री मुलीधराची विविध रूपे साकारली जातात. तसेच, विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम येथे होत आहेत. नाशिक शहराची धार्मिक आणि आध्यात्मिक शहर म्हणून ओळख आहे. गोदावरीच्या काठावर वसलेले हे शहर तीर्थक्षेत्र Nashik is known as Pilgrimage म्हणून Nashik Shri Krishna Janmashtami ओळखले जाते.
नाशिक शहराला अनेक मंदिरांचा वारसा नाशिक शहरात लहान-मोठी 2000 मंदिरे आहेत. यात बहुतांश मंदिरे ही पुरातन आहेत. असेच एक मंदिर म्हणजे नाशिकच्या कापड बाजारातील श्री मुरलीधर मंदिर हे होय. हे मंदिर 200 वर्षे जुने असल्याचे बोलले जाते. या मंदिरात अखंड पाषाणातील साडेतीन फुटांची श्रीकृष्णाची मूर्ती आहे. 1826 साली गुंडराज महाराजांनी या मंदिराची स्थापना केली.
गुंडराज महाराजांची 14 वी पिढी बघते व्यवस्थापन आजही गुंडराज महाराजांची 14 वी पिढी या मंदिराचे व्यवस्थापन बघत आहे. दरवर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव या मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहा दिवस या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. या दरम्यान श्री मुरलीधराचे विविध रूपे साकारली जातात. यात झुल्यावर विराजमान कृष्ण, शेषनाग, मोर, मोहिनी, अर्धनारीनटेश्वर, झुल्यावर कृष्ण रूप, गरुडावर विराजमान कृष्ण, रथावर विराजमान कृष्ण, घोंगडीवाला कृष्ण अशा विविध प्रकारचे रूप साकारले जातात, कृष्णाची ही विविध रूप बघण्यासाठी नाशिक शहरातून भाविक या मंदिरात गर्दी करीत असतात.
अशीही मान्यता श्री मुरलीधर मंदिरात मागितलेली मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच, ज्यांचे लग्न जमत नाही, वंशवृद्धी होत नाही, अशांना मंदिरातून श्रीकृष्णाची मूर्ती दिली जाते. यानंतर त्यांची मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची मान्यता आहे. त्यामुळे कृष्णजन्माष्टमीला येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.