ETV Bharat / city

मोकाट श्वानांच्या गळ्यात राणे नावाच्या पाट्या टाकत शिवसेनेचे आंदोलन - nashik shivsena news in marathi

शिवसैनिकांनी भाजपा कार्यालय परिससरात श्वानांच्या गळ्यात राणे नावाच्या पाट्या टाकत जोरदार आंदोलन केले आहे.

http://10.10.50.85:6060/reg-lowres/16-March-2021/mh-nsk-rtu-shivsenamovement-mh10018_16032021130610_1603f_1615880170_725.mp4

author img

By

Published : Mar 16, 2021, 2:48 PM IST

Updated : Mar 16, 2021, 2:55 PM IST

नाशिक - युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्यावर आरोप केल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी भाजपा कार्यालय परिससरात श्वानांच्या गळ्यात राणे नावाच्या पाट्या टाकत जोरदार आंदोलन केले आहे. या श्वानांना भाजपा कार्यालयात सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलन रोखल्याने पुढील वाद टळला.

वसंतस्मृती कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी

युवा सेनेच्या वतीने नीतेश व नीलेश राणे यांचा निषेध करण्यासाठी भाजपा कार्यालयासमोर जर्मन शेफर्ड श्वान नेऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. वरुण सरदेसाईवरून शिवसेना युवासेना आणि भाजपात वाद चिघळला. वरुण सरदेसाई यांच्यावर राणे पुत्रांनी पत्रकार परिषद घेत खंडणी वसुलीचे गंभीर आरोप केले होते. त्यामुळे शिवसैनिक व राणे यांच्यातील वाद पुन्हा चिघळला असून नाशिकमध्ये त्याचे पडसाद पाहायला मिळाले आहे. शिवसैनिकांनी नारायण राणे व त्यांचे पुत्र नीतेश व नीलेश यांच्याविरोधात भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.

'भाजपाची सोडलेली कुत्री'

दोन जर्मन शेफर्ड श्वानांच्या गळ्यात नीलेश व नीतेश नावाच्या पाटया टाकत राणेंविरुध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांना यावेळी भाजपा कार्यालयासमोर जाण्यास पोलिसांनी रोखले. पोलिसांनी त्यांना रोखल्याने शिवसैनिकांनी कार्यालयाजवळच्या रस्त्यावर हे आंदोलन केले. युवा सेनेचे शहराध्यक्ष दीपक दातीर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोन जर्मन शेफर्ड जातीचे श्वान आणले. यावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाची सोडलेली कुत्री यासारख्या घोषणा राणे यांच्याविरोधात दिल्या. तसेच आदित्य ठाकरे आगे बढो, यासह वेगवेगळ्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Last Updated : Mar 16, 2021, 2:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.