नाशिक - सातपूर परिसरातील तीन मुलींना फूस लावून विवाह करण्याच्या आमिषाने राजस्थान व गुजरात येथे नेले होते. या तीन मुलींची सुटका करत पैसे घेऊन विवाह करणाऱ्या टोळीला सातपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या तीन मुलींपैकी एक मुलगी अल्पवयीन आहे. सातपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तीन मुलींची सुटका झाली आहे.
या तीन मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून एक पुरूष आणि दोन महिला, अशा तीन आरोपींना सातपूर पोलिसांनी अपहरण केल्याप्रकरणी राजस्थान आणि गुजरातमधून ताब्यात घेतले आहे.
सातपूर परिसरातून अल्पवयीन मुलीस फूस लावून अपहरण करण्यात आले होते. याबाबत तक्रार आली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखत आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मूजगर, सहाय्यक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक शांतीलाल हवालदार मनोहर सूर्यवंशी, डी. के. पवार, राजेंद्र घुमरे, सागर कुलकर्णी, विनायक आव्हाड, जावेद शेख यांनी शोध मोहीम राबवत राजस्थान आणि गुजरातमध्ये आरोपींना अटक केली असल्याची माहिती राकेश हांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यानी दिली आहे.