ETV Bharat / city

आरएसएस प्रमुख मोहन भागवत बुधवारी नाशिकमध्ये, 'या' कार्यक्रमाला राहाणार उपस्थित

आरएसएस प्रमुख भागवतांच्या दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यात काही महत्त्वाच्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहाणार आहेत. कोरोना महामारीमुळे सध्या मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रमांना परवानगी आहे. कोरोना नियमावलींचे पालन करत भागवतांच्या उपस्थितीत १४ जुलै रोजी आयुर्वेद व्यासपीठ या संघटनेच्या चरक भवन या केंद्रीय कार्यालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण कार्यक्रम होणार आहे. दुपारी दोन वाजता भागवतांच्या प्रमुख उपस्थितीत या नूतन वास्तूचे लोकार्पण होईल. त्यांतर कन्नमवार पुलाजवळील या नूतन कार्यालयाच्या वास्तूस भागवत भेट देणार आहेत. दुसऱ्या दिवशी अर्थात 15 जुलै रोजी भागवतांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामी श्री सवितानंद यांचा अमृतमहोत्सव कार्यक्रम होईल.

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat on Wednesday in Nashik
सरसंघचालक डॉ मोहन भागवत बुधवारी नाशिकमध्ये
author img

By

Published : Jul 12, 2021, 12:26 PM IST

नाशिक - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. १४ आणि १५ जुलै रोजी भागवत शहरात राहाणार आहेत. मोहन भागवतांच्या उपस्थितीत १४ जुलै रोजी आयुर्वेद व्यासपीठ या संघटनेच्या चरक भवन या केंद्रीय कार्यालयाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण होणार असून १५ जुलै रोजी स्वामी सवितानंद यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात डॉ भागवत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोरोना मुळे या दोन्ही कार्यक्रमांना मोजक्या लोकांची उपस्थिती राहाणार असल्याचे आरएसएस पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

'असा' आहे भागवतांचा नाशिक दौरा

आरएसएस प्रमुख भागवतांच्या दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यात काही महत्त्वाच्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहाणार आहेत. कोरोना महामारीमुळे सध्या मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रमांना परवानगी आहे. कोरोना नियमावलींचे पालन करत भागवतांच्या उपस्थितीत १४ जुलै रोजी आयुर्वेद व्यासपीठ या संघटनेच्या चरक भवन या केंद्रीय कार्यालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण कार्यक्रम होणार आहे. दुपारी दोन वाजता भागवतांच्या प्रमुख उपस्थितीत या नूतन वास्तूचे लोकार्पण होईल. त्यांतर कन्नमवार पुलाजवळील या नूतन कार्यालयाच्या वास्तूस भागवत भेट देणार आहेत. दुसऱ्या दिवशी अर्थात 15 जुलै रोजी भागवतांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामी श्री सवितानंद यांचा अमृतमहोत्सव कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम नक्षत्र लॉन्स,गंगापूर रोड या कार्यालयात दुपारी दोन वाजता आयोजित केला आहे. करोना प्रतिबंधामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे दोन्ही कार्यक्रम होणार आहेत.
अशी माहिती संघाचे नाशिक शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे यांनी दिली आहे.

'डीएनए' दाव्यामुळे होते भागवत चर्चेत

मुस्लिम मंचच्या कार्यक्रमात संघ प्रमुख भागवतांनी या देशातील सर्व जाती धर्मातील लोकांचा मग ते हिंदू असतील किंवा मुसलमान, या सर्वांचा डीएनए एकच असल्याचे म्हटले होते. तसेच लिंचिंग करणारे हिंदूत्व विरोधी असल्याचेही वक्तव्य भागवतांनी या कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मोहन भागवत यांच्या विधानावर भाष्य केले होते. 'मोहन भागवत जी, ही शिकवण तुम्ही आपल्या शिष्यांना, उपदेशकांना, विश्व हिंदू परिषदेला, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाही द्याल का, ही शिकवण तुम्ही मोदी-शाह आणि भाजपाचे मुख्यमंत्र्यांनाही देणार आहात का?' असा सवाल काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.