ETV Bharat / city

Sambhajiraje Chatrapati meet Chagan Bhujbal : मी वंशज, पण भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार – संभाजीराजे छत्रपती - Sambhajiraje Chatrapati meet Chagan Bhujbal

खासदार संभाजीराजे छत्रपती ( MP Sambhaji Raje Chhatrapati ) म्हणाले, की छत्रपती शाहू महाराज यांनी पहिल्यांदा देशात अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींना आरक्षण दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेची ( Babasaheb Ambedkar constitution ) निर्मिती करून आरक्षण दिले आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी ( Chhatrapati Shahu Maharaj work ) बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केले आहे.

छत्रपती संभाजीराजे छगन भुजबळ
छत्रपती संभाजीराजे छगन भुजबळ
author img

By

Published : Apr 4, 2022, 10:38 PM IST

Updated : Apr 4, 2022, 10:47 PM IST

नाशिक - मी जरी वंशज असलो तरी मंत्री छगन भुजबळ यांनी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालविला आहे. ते त्यांच्या विचारांचे वारसदार असल्याचे मत खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले. तर बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी आम्ही एकमेकांना ताकद देऊ, अशी ग्वाही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ ( Chagan Bhujbal Chatrapati Bhosale meet ) यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

खासदार संभाजीराजे छत्रपती ( MP Sambhaji Raje Chhatrapati ) म्हणाले, की छत्रपती शाहू महाराज यांनी पहिल्यांदा देशात अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींना आरक्षण दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेची ( Babasaheb Ambedkar constitution ) निर्मिती करून आरक्षण दिले आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी ( Chhatrapati Shahu Maharaj work ) बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केले आहे. मी त्यांचा वंशज आहे. त्यांनी केलेले काम पुढे अविरत सुरू ठेऊन बहुजन समाजाला एकत्र ठेवण्याचे माझे प्रयत्न आहेत.

भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार

संभाजीराजे आणि छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड तब्बल एक तास चर्चा- न्यायालयात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा संघर्ष सुरू असताना आज मराठा आरक्षणाच्या लढ्याचs नेतृत्व करणारे संभाजी राजे छत्रपती आणि ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड तब्बल एक तास चर्चा झाली. या चर्चेत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे समोर आले नाही. मात्र या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मराठा समजतील काही नेते ओबीसीमधून आरक्षण मागत असल्याने त्याला भुजबळांनी वेळोवेळी विरोध केला. अशातच भुजबळांची संभाजीराजेंनी भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

छत्रपती शाहू महाराज आणि नाशिकचा जुना संबंध-नाशिक येथे झालेल्या मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनाच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबळ यांची भेट झाली होती. त्यावेळी घरी येणार असs मी त्यांना सांगितलं होत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून भेट झाली नाही. आज नाशिक येथे कार्यक्रमानिमित्त आलो असता त्यांची भेट घेतली. छत्रपती शाहू महाराज आणि नाशिकचा जुना संबंध आहे. नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला त्यांनी मोठी मदत केली होती. तसेच पिंपळगाव बसवंत येथील सत्यशोधक चळवळीत काम करणारे सत्यशोधक गणपतराव मोरे यांना त्यांच्या कामाबद्दल अधिक बळ दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

भेटीत बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रामुख्याने चर्चा - छत्रपती शाहू महाराज यांच्या ६ मे रोजी असलेल्या स्मृती शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाबद्दल आमची चर्चा झाली आहे. या निमित्ताने छत्रपती शाहू महाराज यांचे विचार जगभरात पोहचविण्यासाठी ही संधी असून त्यादृष्टीने आमच्याकडून संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येणार आहेत. या भेटीत बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांचे विचार तळागाळातील नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मी जरी छत्रपती शाहू महाराज यांचा वंशज असलो तरी मंत्री छगन भुजबळ छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पहिल्यापासूनच समाजात रुजवीत आहेत. ते त्यांच्या विचारांचे खरे वारसदार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मराठा आणि ओबीसी हा कुठलाही वाद नाही बहुजन समाजासाठी आपला लढा आहे. फार थोडे लोक असा वाद करतात त्याला आपला विरोध आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर आपण सर्वांनी एकत्रित आल्यावर आपल्याला न्याय मिळणार आहे. त्यामुळे बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र ठेवण्याचा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार - मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांना भेटण्यासाठी निमंत्रण दिले होते. मात्र अनेक दिवसांपासून भेट होऊ शकली नाही. आज त्यांची भेट झाली याचा विशेष आनंद आहे. भेटीमध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याशी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी खूप चर्चा झाली. छत्रपती शाहू महाराज हे आमचे देव आहेत. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर आम्ही काम करत आहोत. ६ मे रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षभर अखिल भारतीय महात्मा फुल समता परिषदेच्यावतीने सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनेदेखील राज्यभर कार्यक्रम घेण्याबाबत खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा करून कार्यक्रम राबविण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

निवडणुकीच्या वेळेस ओबीसी मराठा वाद पसरविण्याचा प्रयत्न- सत्यशोधक समाजाच्या लोकांना शाहू महाराजांनी मोठ पाठबळ दिले व मदत केली. समाजातील वंचित घटकांना त्यांनी न्याय मिळवून दिला. त्यामुळे बहुजन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. त्यादृष्टीने आम्ही एकमेकांना ताकद देणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, मराठा ओबीसी असा कुठलाही वाद नाही. ओबीसी आरक्षणास कुठल्याही लोकप्रतिनिधीने विरोध केलेला नाही. काही विघातक प्रवृत्ती केवळ निवडणुकीच्या वेळेस ओबीसी मराठा वाद पसरविण्याचा प्रयत्न करतात. त्याला जनता बळी पडणार नाही. सध्या देशभरात जे वातावरण आहे, त्याबद्दल वेगळे सांगायला नको. फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार देशाला या दलदलीतून वाचवू शकतात, असे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा-Bullet Bike Blast : नवीन बुलेट घेऊन पोहोचला मंदिरात; अचानक पेट घेतल्याने झाला बुलेटचा स्फोट

हेही वाचा-Chitra Wagh Vs Satej Patil : 'आपण कोल्हापूरचे पालक आहात, मालक बनण्याचा प्रयत्न करू नका'

हेही वाचा-Mumbai School Bus Missing : अखेर 'ती' स्कूल बस सापडली; पालकांचा जीव भांड्यात

etv play button

Last Updated : Apr 4, 2022, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.