ETV Bharat / city

रविवारच्या बंदमधून सलून व्यवसायाला सूट द्यावी; नाभिक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी दुकानांवर काही निर्बंध आणले आहेत. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी दुकाने पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

nashik
नाभिक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
author img

By

Published : Mar 15, 2021, 6:35 PM IST

Updated : Mar 15, 2021, 7:02 PM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी दुकानांवर काही निर्बंध आणले आहेत. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी दुकाने पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना यातून सूट देण्यात आली आहे. या बंदमधून सलून व्यवसायाला सूट द्यावी, अशी मागणी नाभिक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सलून व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया

हेही वाचा - शेतकऱ्याने मुलाप्रमाणे केले बैलावर प्रेम, वाजत गाजत काढली अंत्ययात्रा

नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोज कोरोनाचे एक हजाराच्या वर नवीन रुग्णांची भर पडत असून 6 हजारहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी दुकानांबाबत निर्बंध कडक केले असून, जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकानांना सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शनिवारी आणि रविवारी पूर्ण दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, रविवार हा दिवस सलून व्यवसायासाठी महत्वाचा असल्याने अनेकजण सुट्टीचा दिवस बघून सलून दुकानात येत असल्याने रविवारच्या दिवशी सलून व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी नाभिक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

आम्ही कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करतो -

मागील वर्षी कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे सलून व्यावसायिकांचे मोठं नुकसान झालं आहे.या काळात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून उपासमारीची वेळ आली होती.आता कुठे तरी गेल्या तीन महिन्यापासून सलून व्यवसाय सुरळीत होत असताना पुन्हा एकदा शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून यामुळे आमचा सलून व्यवसाय अडचणीत सापडला आहे. प्रशासनाने रविवारी सलून व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी.आम्ही कोरोना नियमाचे नेहमी प्रमाणे काटेकोर पालन करू अशी विनंती नाभिक संघटनेचे पदाधिकारी संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याचे म्हटलं आहे.

हेही वाचा - वाझे प्रकरणात शिवसेना युवानेत्याचे नाव; कोण आहेत वरूण सरदेसाई?

Last Updated : Mar 15, 2021, 7:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.