नाशिक : नाशिकच्या वणी सप्तशृंगी गडावरील बोकड बळी देण्याच्या निर्णयाला न्यायालयाने मान्यता दिल्या नंतर, आज गडावर बोकड बळी देण्यात (Sacrificed buck at Saptshringi Devi fort) आला. 2016 नंतर आज पुन्हा वणी परिसरात मिरवणूक काढून सप्तशृंगी गडावर बोकड बळी देण्यात आला. न्यायालयाने बोकड बळी निर्णयाचा फेरविचार करावा; अन्यथा आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा (now focus on Mahants role Nashik) महंत अनिकेत शास्त्री देशपांडे (Mahant Aniket Shastri Deshpande) यांनी दिला होता. आता ते पुढे काय भूमिका घेणार या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
साधुमहंतांनी केली नाराजी व्यक्त : न्यायालयाने सप्तशृंगी गडावरील बोकड बळीला परवानगी दिल्याने, नाशिक मधील साधू महंत आक्रमक झाले आहे. पशुहत्येच्या विरोधात महंत अनिकेत शास्त्री महाराज आमरण उपोषण करणार आहे. महंत अनिकेत शास्त्री यांच्या भूमिकेला इतर महंतांचा देखील पाठिंबा आहे. पशुहत्येच्या विरोधात सरकारने कठोर पाऊल उचलत विशेष कायदा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर देखील पुन्हा एकदा फेरविचार करण्याची साधू महंतांची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच वणी येथील 5 वर्षांपासून बंद असलेल्या बोकड बळी प्रथेला न्यायालयाने पुन्हा एकदा परवानगी दिल्याने, साधुमहंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. दसराच्या दिवशी वणी येथील सप्तशृंगी देवीच्या गडावर बोकड बळी देण्याची आहे परंपरा आहे.
नाही तर आमरण उपोषण करणारा : न्यायालयाने बोकड बळी निर्णयाचा फेरविचार करावा. आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिल्या नंतर सुद्धा बोकड बळी देण्यात आला याची खूप खंत आहे. उद्या आम्ही सगळ्या साधी आखाड्याचे साधू- महंत एकत्र येणार आहे आणि या विषयावर चर्चा करून शासनला निवेदन देत त्यांना अल्टीमेटम देणार आहे. त्या कालावधीत जर बोकड बळी बंदी बाबत शासनाने निर्णय घेतला नाही तर, मी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे महंत अनिकेत देशपांडे यांनी सांगितलं.