नाशिक - हवामान विभागाने ( Meteorological Department ) 11 ते 14 जुलै या कालावधीत जिल्ह्याला रेड अलर्ट ( Red alert in the district ) दिला असून, जोरदार पावसाची ( Nashik Rains update ) शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने ( Nashik District Administration ) केले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे. नदीकाठी पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. 4 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची (Heavy Rain ) जोरदार बॅटिंग सुरु असून गंगापूर, दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. परिणामी सोमवारी नांदूरमधमेश्वर धरणातून 66 हजार क्युसेस वेगाने जायकवाडिकडे विसर्ग सुरू आहे.
सतर्कतेचा इशारा - मागील चार दिवसांपासून जिल्ह्याला ( district ) चांद्यापासून ते बांद्यापर्यंत पावसाने झोडपून काढले आहे. त्यात आता वेधशाळेने ( Meteorological Department ) पुढील 4 दिवस अतिवृष्टिचा ( Heavy rain ) इशारा दिला आहे. गंगापूर धरणासह दारणा, गिरणा समूहात अतिवृष्टी होत असून पुर परिस्थिती टाळण्यासाठी विसर्ग केला जात आहे. नाशिकची तहान भागविणारे गंगापूर धरण 72 टक्के भरले असून त्यातून 10 हजार क्युसेसने विसर्ग सुरु आहे. त्यात वेधशाळेने रेड अलर्ट दिल्याने विसर्गाचा वेग वाढण्याची चिन्हे असून नदी काठच्या नागरिक व दुकानदारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील शाळा सुरु ठेव्यावा की सुट्टी द्यावी याबाबत शिक्षण अधिकारी निर्णय घेणार - शहरासह जिल्ह्यातील शाळा सुरु ठेव्यावा की सुट्टी द्यावी याबाबत शिक्षण अधिकारी निर्णय घेणार आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांचे हाल होणार नाही ही दक्षता घेतली जात आहे. तसेच पूरजन्य परिस्थितीचा धोका पाहता मदत व बचाव कार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्टवर ठेवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाची तीव्रता वाढल्यास धारणांमधील विसर्गाचे प्रमाण वाढविण्यात येईल. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच नदीकाठी पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
हवामान खात्याकडून या जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. गोदेला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आला आहे. पुर मापनाचे मापक असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या मानेला पाणी लागले. तर दारणा धरणातून 15 हजार क्युसेस वेगाने विसर्ग सुरु होता. पालखेड धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. 20 हजार क्युसेस वेगाने पालखेड धरणातून कादवात पाणी सोडण्यात आले. परिणामी पाण्याचा वाढती आवक पाहता नांदूरमध्यमेश्वर धरणातून तब्बल 66 हजार क्युसेसने विसर्ग सुरु आहे. हे पाणी थेट जायकवाडिला पोहचणार असल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे. गंगापूर धरणातून 10035 क्यूसेस विसर्ग, दारणा - 15572 क्यूसेस विसर्ग, पालखेड - 20888 क्यूसेस विसर्ग, ना.मधमेश्वर - 66790 क्यूसेस विसर्ग करण्यात आला आहे.