नाशिक : तब्बल दोन वर्षानंतर उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या दसऱ्याला (Dussehra 2022) नाशिक शहरातील पंचवटी, इंदिरानगर, उपनगर, गंगापूर रोड ,काठे गल्ली या पाच ठिकाणी रावण दहन (Ravana effigy is worshiped before the burning of Ravana) करण्यात येणार आहे. रामकुंड येथे चतुसंप्रदायाच्या वतीने गेल्या 56 वर्षापासून रावण दहनाची परंपरा जपली जात आहे. यंदाही मंडळाच्या वतीने या परिसरात 60 फुटी रावणाची प्रतिकृती उभारण्यात येणार असून; यापूर्वी परिसरातून राम-लक्ष्मण, सीता मातेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच गंगापूर रोडवरील शिवसत्य मैदानात तुळजाभवानी मंदिर परिसरात 55 फुटी रावण दहन करण्यात येणार आहेत. इंदिरानगर येथे युनिक ग्रुपच्या वतीने रावण दहन होणार असून; सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहे. रामलीलासाठी प्रसिद्ध असलेल्या उपनगर येथे 58 फुटी रावणाचे दहन करण्यात येणार आहे,या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
रावण दहनाची जय्यत तयारी : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून दसरा उत्सवावर निर्बंध होते. मात्र सर्व नियम हटवल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आहे. मागील नऊ दिवसापासून तुळजाभवानी मंदिरात विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. तसेच रावण दहनाचा भव्य सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. यासाठी दरवर्षी प्रमाणे 55 फुटी रावणाची प्रतिकात्मक प्रतिकृती साकारण्यात आली आहे, अशी माहिती शिवसत्य मित्र मंडळाचे पदाधिकारी योगेश हिरे यांनी दिली.
दुष्ट प्रवृत्तीचा, राक्षसी वृत्तीचा नाश होऊन प्रभू रामाचे चांगले विचार सर्वांना समजावे यासाठी, सुरवातीला रावणाचे पूजन करून नंतर रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल जाते.Dussehra 2022