नाशिक - महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा कृषी रत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते घेण्यास रोहित पवार यांचे वडील आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी नकार दिला. छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले दाम्पत्य यांच्यासंदर्भात कोश्यारी यांनी केलेले वादग्रस्त विधाने लक्षात घेता त्यांच्या हातून पुरस्कार घेण्यास राजेंद्र पवार यांनी नकार दिला. आज नाशिक येथे मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला. त्यात राजेंद्र पवार अनुपस्थित होते.
100 हून अधिक जणांचा गौरव - राज्यपाल महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमधील सुप्त संघर्ष वेळोवेळी समोर आला आहे. आता हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे वडील आणि बारामती कृषी केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी राज्यपाल भगतसिंग यांच्या हातून पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने राजेंद्र पवार यांना कृषिरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार जाहीर केला होता. अशात काल या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यात राज्यपालांच्या हस्ते 100 हुन अधिक जणांना कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गौरवण्यात आलं. मात्र या कार्यक्रमात राजेंद्र पवार यांची अनुपस्थित चर्चेचा विषय ठरला.
हेही वाचा - Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयाला दान-धर्माला का आहे विशेष महत्व?; पाहा, VIDEO...
मला त्यांनी विचारलं नाही - राजेंद्र पवार यांनी मी तुमच्या हातून पुरस्कार स्वीकारणार नाही, असं मला म्हटले नाही. मग तुम्ही असा प्रश्न का विचारता, असा सवाल राज्यपाल कोश्यारी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर केला.