ETV Bharat / city

Raj Thackeray In Nashik : भाजपा-मनसे युतीची चर्चेवर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले... - राज ठाकरे उद्धव ठाकरे पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे (Raj Thackeray In Nashik) नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद (Raj Thackeray Nashik PC) साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक मुद्यांवर पक्षाची भुमिका मांडली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपा-मनसे युतीबाबतही (Raj Thackeray BJP MNS Alliance) भाष्य केले.

Raj Thackeray In Nashik
author img

By

Published : Dec 13, 2021, 3:31 PM IST

Updated : Dec 13, 2021, 4:01 PM IST

नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे (Raj Thackeray In Nashik) नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद (Raj Thackeray Nashik PC) साधला यावेळी त्यांनी राज्यातील अनेक मुद्यांवर पक्षाची भुमिका मांडली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपा-मनसे युतीबाबतही भाष्य केले. युतीच्या चर्चा तुम्हीच घडवून आणतात. तुमचा सोर्स समजत नाही, अशा युतीच्या चर्चा सुरू असतील पण त्या चर्चांच मला माहित नाही, असे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray BJP MNS Alliance) यांनी भाजपाला टाळी देण्याबाबत सविस्तर बोलणे टाळले.

प्रतिक्रिया
  • काय म्हणाले राज ठाकरे -

एसटीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना (Raj Thackeray Letter To CM Uddhav Thackeray) पत्र देणार असल्याचे सांगून एसटीला फायद्यात आणण्यासाठी आता एखादी मॅनेजमेंट कंपनी स्थापन करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. पेपर फुटीचे प्रकरण (Eam Paper Leak) हे अतिशय गंभीर आहे. त्यावर राज्य सरकारने आता विचार केलाच पाहिजे, असा सल्लादेखील त्यांनी दिला आहे.

  • '...तर यांचा जीव कासावीस होतो' -

राज ठाकरे यांना आगामी निवडणुकांबाबत विचारले असता, पक्षाची रणनिती ही पत्रकार परिषद घेऊन सांगता येणार नाही. निवडणुकीच्या वेळी नागरिकांनी मनसेने नाशिकमधील केलेली कामं लक्षात ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. एसटी संपावर बोलताना ते म्हणाले, कर्मचारी या वेळी युनियन सोडून एकत्र आले आहेत. त्यामुळे त्यांची दखल घ्यायला हवी. जनतेने लोकांसाठी राज्य दिले आहे. त्यांच्यावर नेत्यांनी अरेरावी करु नये. नेत्यांच्या घरी भ्रष्टाचाराचे पैसे येत नाही, तर यांचा जीव कासावीस होतो. तर या गरिबांच्या घरी चार महिने पगार नाही. या विषयी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे. त्यांची तब्येत बरी नसल्याने पत्र दिले नाही. एसटी एखाद्या मॅनेजमेंट कंपनी देऊन नफ्यात येऊ शकते, असे पर्याय त्यांनी सुचवला.

  • 'लोकांनी सुज्ञ व्हावे' -

परीक्षेचा घोळ करणाऱ्या या लोकांना शासन व्हायला हवे. तसेच प्रत्येक वेळेस परीक्षेचे पेपर का फुटतात तिचा विचार हा केला गेला पाहिजे. लोक मनावर घेत नाही. निवडणुकीच्या वेळी हे सगळं विसरले जातात म्हणून अशी वेळ येते. ज्या त्रासातून आपण गेलो आहोत, ते त्रास लोक निवडणुकीत विसरून जातात. नागरिकांनी सुशिक्षित असून चालत नाही, तर सुज्ञ असावं लागतं, असंही ते म्हणाले.

  • गेली 60 वर्ष पवारांचे दर्शन -

शरद पवार यांना ८१ वर्ष (Raj Thackeray Sharad Pawar Birthday) पूर्ण होत आहेत. हे चांगलं आहे. हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे. देश गेली ६० वर्ष शरदचंद्र दर्शन करतो आहे. महाराष्ट्रात ते या वयात ज्या प्रकारे फिरताय ते घेण्यासारखं आहे. राजकीय मतभेद असतात. मात्र, चांगल्याला चांगल म्हटल पाहिले, ही संस्कृती आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - Deepak Dalvi Face Blackened : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवींवर शाई फेक; उद्या बेळगाव बंदची हाक

Last Updated : Dec 13, 2021, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.