नाशिक - शहरामध्ये दिवसभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. नाशिकच्या दाहीपुल भागात मोठ्या प्रमाणत पाणी साचले आहे. या परिसरात असलेल्या दुकानात पाणी साचल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.
गेल्या 24 तासांपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणत पाणी साचले आहे. शहराची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या सराफ बाजार, दाहीपुल भागात मोठया प्रमाणात पाणी साचले आहे. येथील दुकानात पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच या भागात उभी असलेली वाहनात पाण्यात गेल्याने वाहनाचेदेखील नुकसान झाले आहे.
हेही वाचा-मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; इगतपुरी स्थानकादरम्यान अडकली अमरावती एक्सप्रेस
दुकानात पाणी शिरल्याने दुकानदारांचे अतोनात हाल-
नाशिकच्या दाहीपुल भागात स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू आहेत. या परिसरात रस्त्याचे खोद काम करण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या भागातील व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एकीकडे कोरोनामुळे वर्षभरापासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यावसायिकांना रस्त्याच्या कामामुळे नाईलाजाने दुकाने बंद ठेवावी लागते आहे. तर दुसरीकडे पावसामुळे दुकानात पाणी शिरल्याने दुकानदारांचे अतोनात हाल होत असल्याचे चित्र आहे. दुकानदारांनी महापालिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा-मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहता यांचा फ्लॅट सील; प्राप्तिकर विभागाची कारवाई