ETV Bharat / city

खासगी क्लासेसला उद्योगाचा दर्जा द्यावा, अन्यथा.. प्रा. बंडोपंत भुयार यांचा इशारा - start private classes demand

महाराष्ट्र सरकारने खासगी क्लासेसला उद्योगाचा दर्जा द्यावा, ही प्रमुख मागणी करत 50 टक्के क्षमतेने क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा असहकार आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा कोचिंग क्लास टीचर्स असोसिएशन अँण्ड सोशल फोरम आँफ महाराष्ट्रच संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. बंडोपंत भुयार यांनी दिला.

start private classes demand Bandopant Bhuyar
खासगी क्लास बंडोपंत भुयार इशारा
author img

By

Published : Aug 8, 2021, 7:29 PM IST

नाशिक - केंद्र सरकारने खासगी कोचिंग क्लासेसला सूक्ष्म उद्योगाचा दर्जा दिला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने खासगी क्लासेसला उद्योगाचा दर्जा द्यावा, ही प्रमुख मागणी करत 50 टक्के क्षमतेने क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा असहकार आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा कोचिंग क्लास टीचर्स असोसिएशन अँण्ड सोशल फोरम आँफ महाराष्ट्रच संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. बंडोपंत भुयार यांनी दिला.

माहिती देताना कोचिंग क्लास टीचर्स असोसिएशनचे प्रा. बंडोपंत भुयार

हेही वाचा - नाशिक : सराफ दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांना अटक

50 टक्के क्षमतेने क्लासेस सुरू करण्याची मागणी

संदीप फाउंडेशन येथे रविवारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत भुयार बोलत होते. मागील सरकारमध्ये विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना क्लासेसला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी समिती गठित केली व अहवाल तयार केला. मात्र, नवीन सरकार आले व तो अहवाल धुळखात पडला आहे. राज्य सरकारने खासगी क्लास चालकांना उद्योगाचा दर्जा देऊन राजमान्यता द्यावी, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षांपासून खासगी कोचिंग क्लासेस बंद आहेत. शासनाने महसुलाच्या दृष्टिकोनातून मद्य विक्री, माॅल यांना परवानगी दिली. मात्र, शैक्षणिक क्षेत्राकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून अनास्था पहायला मिळत असल्याचे भुयार म्हणाले.

ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी त्यातून विद्यार्थ्यांचा फारसा फायदा होताना दिसत नाही. क्लासेस सुरू करावे ही पालकांची देखील मागणी आहे. राज्यशासनाने शाळा, महाविद्यालये व खासगी क्लासेस यांच्यासाठी एकाच पद्धतीचे निकष लागू करू नये. खासगी क्लासेसमुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीत महत्वाचे योगदान आहे. खासगी क्लासेसवाले सुशिक्षित बेरोजगार आहेत. क्लास बंदमुळे आमचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने आम्हाला कोणतेही अनुदान दिले नाही. आर्थिक संकटातून सावरण्यासाठी राज्य सरकारने 50 टक्के क्षमतेने क्लासेस सुरू करण्यास त्वरीत मान्यता द्यावी, अशी मागणी भुयार यांनी केली.

3 हजार कोटींचे नुकसान

राज्यात क्लासेसच्या माध्यमातून वर्षाला 25 हजार कोटींची उलाढाल होते. टॅक्सच्या माध्यमातून शासनाला तीन हजार कोटींचा महसूल मिळतो. पण, क्लास बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले आहे. जवळपास 80 टक्के क्लासचालक बेरोजगार झाले आहेत, अशी माहितीही भुयार यांनी दिली.

हेही वाचा - येवल्यात 4 एकर डाळिंब बागावर शेतकऱ्याने चालवली कुऱ्हाड, कोरोना महामारीमुळे ओढावले संकट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.