नाशिक - मालेगाव येथील पोलीस उपअधिक्षक रत्नाकर नवले यांचे सहाय्यत म्हणून काम करणारे पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास नियंत्रण कक्षातील महिला समुपदेशन केंद्रा समोरील झाडाखाली घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. मात्र, अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
विशेष म्हणजे घटना घडली त्यावेळी नियंत्रण कक्षातील सुसंवाद कक्षात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंह यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक सुरू होती. बैठक संपल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना अजहर शेख हे झाडाखाली रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. मात्र, आद्यप शेख यांनी आत्महत्या का केली यांचे कारण समजू शकले नाही