ETV Bharat / city

कोजागिरीच्या पुर्वसंध्येला दुधाच्या किंमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ - etv bharat marathi

कोजागिरी आणि ईदमुळे दुधाच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हशीच्या दुधाचे 60 रुपयांवरून 80 रुपये प्रतिलिटर पोहचले आहे. तर, गाईचे दूध 40 रुपयांवर 50 रुपये लिटरपर्यंत पोहचले आहेत. दुधाची मागणी वाढल्याने भाव वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.

कोजागिरीच्या पुर्वसंध्येला दुधाच्या किंमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ

author img

By

Published : Oct 19, 2021, 10:49 AM IST

नाशिक - कोजागिरी आणि ईदमुळे दुधाच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हशीच्या दुधाचे 60 रुपयांवरून 80 रुपये प्रतिलिटर पोहचले आहे. तर, गाईचे दूध 40 रुपयांवर 50 रुपये लिटरपर्यंत पोहचले आहेत. दुधाची मागणी वाढल्याने भाव वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.

एक दिवस आधीच दुधाची बुकिंग केली

हिंदू धर्मात कोजागरीच्या दिवशी दूध सेवनास विशेष महत्त्व असल्याने तसेच ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घरोघरी दुधाची खीर तयार केली जात असल्याने, दुधाची मागणी वाढली आहे. यामुळे काही दूध व्यवसायिकांनी एक दिवस आधीच सोमवारी दुधाच्या दरात प्रति लिटर दहा ते वीस रुपयांनी वाढ केल्याचे दिसून आले आहे. मात्र, पिशव्यांमध्ये मिळणारे दुधाचे भाव स्थिर होते. कोजागरी पौर्णिमेला वाढणाऱ्या मागणीमुळे ग्राहकांनी एक दिवस आधीच दुधाची बुकिंग केली आहे.

दुधाचे अस आहे महत्व

ईद ए मिलादच्या दिवशी मुस्लीम बांधवांच्याघरी दुधाच्या खिरीवर फातेहा पठण केले जाते. तर, कोजागरीच्या जागरणानिमित्त दूध सेवनाला विशेष महत्त्व असते. या दिवशी चंद्र देवतेस दुधाचा नैवेद्य दाखवून या प्रसादाचे सेवन केले जाते. या दोन्ही सणामध्ये दुधाचे महत्त्व अधिक असल्याने आणि दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने दुधाची प्रचंड मागणी वाढल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा - सत्ता गेल्यानंतर काहींना भ्रमिष्टपणा येतो तर काहींचा तोल जातो, जयंत पाटलांचा चद्रकांत पाटलांना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.