नाशिक - जिल्हा बँकेच्या 182 कोटींच्या अनियमित कर्ज वाटप प्रकरणी विद्यमान व माजी आमदार - खासदारांना वसुलीच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - Bhujbal on anna Hazare : 'वाईन दुकानात मिळणार तर काही लोक उपोषणाला बसणार'
यात विद्यामान आमदार नरेंद्र दराडे, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जीवा पांडू गावित, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, वसंत गीते यांच्यासह 29 आजी माजी संचालक आणि 15 अधिकारी, कर्मचारी यांच्यावर 182 कोटींचे अनियमित कर्ज वाटप प्रकरणात विभागीय सहनिबंधकांनी वसुलीच्या नोटीस बजावल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांशी रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे ही वसुली होणार का? याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
या संस्थांचा समावेश
नाशिक सहकारी साखर कारखाना, निफाड सहकारी साखर कारखाना,आर्मस्ट्राँग सहकारी साखर कारखाना यांच्यासह अनेक संस्थांना देण्यात आलेल्या 182 कोटींच्या कर्ज प्रकरणात विभागीय सहनिबंधकाने अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत, आजी माजी संचालकांना 18 फेब्रुवारी पर्यंत वसुलीची रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा या प्रकरणी दोषींच्या संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात येणाऱ्या असल्याने सहकार क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
18 फेब्रुवारी पर्यंत मुदत
जिल्हा बँकेच्या 182 कोटींच्या कर्ज प्रकरणात 29 आजी माजी संचालक आणि 15 अधिकारी कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, वसुलीसाठी 18 फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. विविध कारखाने आणि कार्यकारी सेवा सोसायटी यांना 182 कोटींचे नियमित कर्ज वितरित करण्यात आल्याने विभागीय सहनिबंधकांनी या कारवाईचे आदेश दिले आहे. 18 फेब्रुवारी पर्यंत वसुलीची रक्कम जमा केली नाही तर, थेट संपत्ती जप्त होणार असल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - Chhagan Bhujbal On Hijab Controversy : जाती धर्माचे विष पेरण्याचे काम करु नका, भुजबळांचा इशारा