नाशिक - अनेक अधिकारी राजकीय नेते आपले फॅन असले तरी अडचणीत आल्यानंतर मात्र कोणीही आपल्याला मदत केली नाही. त्यामुळे पद्मश्री पुरस्कारासाठी मला 11 वर्षे वाट पहावी लागली, अशी खंत गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांनी व्यक्त केली आहे.
याच प्रकरणामुळे 11 वर्षे पद्मश्री पुरस्कारासाठी थांबावे लागले
नाशिक शहरात पद्मश्री सुरेश वाडकर यांनी जमीन घेतली होती. याच जमिनीवर अनेक जणांचा कब्जा होता म्हणून सुरेश वाडकर यांनी अनेक राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची मदत मागितली होती. त्यावेळी 'आम्ही तुमचे फॅन आहोत' म्हणणाऱ्या बड्या राजकीय नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी, भूमाफियांनी त्रास दिल्यानंतर कोणीही मदत केली नाही, असा धक्कादायक खुलासा सुरेश वाडकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. आपल्याला याच प्रकरणामुळे 11 वर्षे पद्मश्री पुरस्कारासाठी थांबावे लागले, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
नाशिक पोलीस आयुक्तांसाठी सादर केले गीत
नाशिक पोलिसांनी भूमाफिया विरोधात तयार केलेल्या एका माहितीपट उद्घाटन सुरेश वाडकर यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी नाशिक पोलीस भूमाफियांविरोधात करत असलेल्या कामाचे कौतुकही केले आहे. माहितीपटाचे उद्घाटन केल्यानंतर सुरेश वाडकर यांनी या काही वर्षांपूर्वी भूमाफियांचा त्यांना कशा पद्धतीने त्रास सहन करावा लागला याचा अनुभव सर्वांसोबत कथन केला आहे. दरम्यान, नाशिक पोलिसांचे तोंडभरून कौतुक करताना सुरेश वाडकर यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्यासाठी खास "तुमसे मिलके ऐसा लगा" है गाणे सादर करतात त्यांना धन्यवाद दिले आहे.
हेही वाचा - बिटको काेविड हॉस्पिटलची तोडफोड करणारे राजेंद्र ताजणे पोलिसांना शरण