ETV Bharat / city

#coronavirus : मालेगावात लष्कराची गरज वाटत नाही : गृहमंत्री - मालेगावात लष्कराची गरज नाही

नाशिक जिल्ह्यातील मालेगावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे येथील बंदोबस्तासाठी लष्कराला बोलवावे, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी सरकारकडे केली होती.

Home Minister Anil Deshmukh in nashik
गृहमंत्री अनिल देशमुख
author img

By

Published : Apr 29, 2020, 2:24 PM IST

नाशिक - नाशिक जिल्ह्यातील मालेगावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे येथील बंदोबस्तासाठी लष्कराला बोलवावे, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी सरकारकडे केली होती. यावर बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, मालेगावात 1800 पोलीस कार्यरत असून गरज पडल्यास आणखीन पोलीस तैनात करू. मात्र, लष्कराला बोलवायची गरज वाटत नाही, असे म्हटले आहे. नाशिक येथे जिल्हा आढावा बैठकीसाठी आले असता गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... परप्रांतीयांचा स्वगृही परतण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार - अनिल देशमुख

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने उद्भवलेली परिस्थिती आणि नाशिक जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था याबाबत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात सर्व प्रशासन यंत्रणा दिवस-रात्र कोरोना विरोधात लढत आहे, असे म्हटले.

मालेगावात गरज पडल्यास अधिक पोलीस तैणात करु...

'मालेगावात कोरोनाची परिस्थितीचा आढावा घेऊन अधिक पोलीस किंवा डॉक्टर लागतील का ते आम्ही पाहु. तसेच मालेगावातील परिस्थिती लवकर कशी आटोक्यात आणता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. सध्या मालेगावात अठराशे पोलीस असून एसआरपीएफ ची संख्या देखील गरज वाटल्यास वाढली जाईल' असे गृहमंत्री यांनी सांगितले.

कर्तव्यावर मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत आणि नोकरीही देऊ

राज्यात कोरोनाच्या लढाईत फ्रंट लाईनला काम करणाऱ्या पोलिसांना पीपीई किट आम्ही देत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. तसेच कर्तव्यावर मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना 50 लाख आणि नोकरीही देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा... पन्नाशीवरील कर्मचाऱ्यांना 'फील्ड ड्युटी' नाही, पुणे पोलिसांचा निर्णय

मुंबईत परप्रांतीय जास्त आहेत, त्यांना त्यांच्या गावी पाठवायला हवे - गृहमंत्री

महाराष्ट्र तसेच मुंबईत परप्रांतीयांची संख्या जास्त आहे. त्यांना त्यांच्या गावी पाठवायला हवे, अशी आमची देखील इच्छा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून लवकर निर्णय घेऊ, असे देशमुख यांनी सांगितले.

गडकरी यांच्या सल्ल्याचे त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी पालन केले तर...

कोरानाच्या कठीण परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी सोबत काम करण्याची गरज आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. मात्र, ज्यांनी महाराष्ट्राचे काही काळ नेतृत्व केले ते सध्या रस्त्यावर दिसण्यापेक्षा राज्यपालांकडे अधिकवेळ दिसतात. असा टोला देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला. तसेच नितीन गडकरी यांनी सांगितल्या प्रमाणे या काळात राजकारण करू नका. हे तत्व त्यांच्या पक्षाच्या लोकांनी पालन केले तर सर्व चांगले होईल, असेही गृहमंत्री देशमुख यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.