नाशिक - जेएनयू विद्यापीठातील हिंसाचाराचे पडसाद शहरातही उमटल्याचे पाहायला मिळाले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जेएनयूमधील हिंसाचारानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची निदर्शने होत असून विविध शहरांमध्ये याचे पडसाद उमटले आहेत. तसेच विविध संघटनांनी कँडल मार्च काढून शांततामय मार्गाने विरोध दर्शवण्यात येत आहे.