ETV Bharat / city

नाशिकरांनी साथ दिली नाही याचे दुःख - राज ठाकरे - Congress

राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह नको म्हणून भाजप आणि सेनेला मतदान करू नका असे म्हटले आहे. शहरात होत असलेल्या राज ठाकरेंच्या सभेत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
author img

By

Published : Apr 26, 2019, 9:31 PM IST

Updated : Apr 26, 2019, 11:35 PM IST

नाशिक - शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक विकासकामे केली. यात 510 किलो मीटरचे अंतर्गत रस्ते, सर्कल, गोदापार्क, बाळासाहेब ठाकरे स्मारक, बोटॅनिकल गार्डन, घन कचरा प्रकल्प, मुकणे धरणे, पाइप लाइन, उड्डाण पुलाखाली सुशोभीकरण असे अनेक कामाचे फोटो वॉलवर दाखवले. मात्र इतके करुनही नाशिकरांनी साथ दिली नसल्याचे दु:ख असल्याची खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

राज ठाकरे यांची आज नाशिकमध्ये सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी भाजपसह पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. त्यासह त्यांनी नाशिकरांवर नाराजीही व्यक्त केली.

राज ठाकरेंच्या सभेत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ उमेदवार आहेत. राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह नको म्हणून भाजप आणि सेनेला मतदान करू नका असे म्हटले आहे.

राज यांची ही भूमिका राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली आहे. समीर भुजबळ यांना उमेदवारी जाहीर होताच नाशिकमधील मनसे पदाधिकारी समीर भुजबळ यांना पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचावर दिसून आले.
छगन भुजबळांनाही राज ठाकरे यांची नाशिकमधील ताकद माहीत असून मोठा युवावर्ग राज ठाकरे यांच्या सोबत आहे. म्हणून भुजबळांनीदेखील नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन गाठी भेटी घेतल्या. मनसेची टीमसुद्धा समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी कामाला लागल्याचे दिसून आले आहे.

लोकांच्य गरजा काय असतात, हे सांगताना राज ठाकरे म्हणाले की, शहरातील लोकांना चांगली शाळा, कॉलेज, बाजार, चित्रपट गृह, बाग, मैदान पाहिजे, तर ग्रामीण भागातील लोकांना वीज, पाणी पाहिजे असेही ते म्हणाले. नाशिक एकमेव शहर आहे, भारतात जिथे टाटा, रिलायन्स, महिंद्रांनी शहराच्या विकासासाठी पैसे टाकल्याचेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Intro:राज ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची गर्दी..

Body:नाशिक मध्ये होत असलेली राज ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे,नाशिक मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस कडून समीर भुजबळ उमेदवारी करत असून राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शहा नको म्हणून भाजप आणि सेनेला मतदान करू नका असं म्हटलं आहे,त्यामुळे त्यांची ही भूमिका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पथ्यावर पडली आहे..समीर भुजबळ यांना उमेदवारी जाहीर होताच नाशिक मधील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते नी समीर भुजबळ यांना पाठिंबा देत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मंचावर दिसून आले..
छगन भुजबळांना सुध्दा राज ठाकरे यांची नाशिक मधील ताकद माहीत असून मोठा युवावर्ग राज ठाकरे यांच्या सोबत आहे..म्हणून भुजबळांनी देखील नाशिक मधील मनसे पदाधिकारी यांच्या घरी जाऊन गाठी भेटी घेतल्या आणि मनसेची टीम सुद्धा समीर भुजबळ यांच्या प्रचार साठी कामाला लागल्याचे दिसून आले आहे..

Conclusion:
Last Updated : Apr 26, 2019, 11:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.