नाशिक - ९४ वे अखिल भारतीय मराठी संमेलनात ( Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2021 ) एका परिसंवादाच्या निमित्ताने आलेले ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर ( Senior Journalist Girish Kuber ) यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक केल्याची ( Activists of Sambhaji Brigade Threw Ink ) घटना घडली आहे. या घटनेवर राज्यातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी ( NCP Chief Sharad Pawar ) देखील प्रतिक्रिया दिली आहे. संघटनेला असा हल्ला करण शोभत नाही. ही अत्यंत निंदनीय घटना आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
- 'महाराष्ट्राची ही संस्कृती नाही'
माध्यमांशी बोलतांना पवार म्हणाले की, गिरीश कुबेर यांच्यावर हल्ला ही घटना निंदनीय आहे. कोणत्याही प्रकारचे समर्थन नसून हा महाराष्ट्र पुरोगामी आहे. मी गिरीश कुबेर यांचे पुस्तक वाचले आहे, काही मुद्द्यांवर वाद आहे. मात्र त्या खोलात मी गेलो नाही. परंतु भूमिका मान्य नसेल तर वैचारिक चर्चा होऊ शकते. कोणत्याही संघटनेने असा हल्ला करणे शोभत नाही. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, असेही पवारांनी म्हटले आहे.
- कार्यक्रमठिकाणी जात असताना कुबेरांवर शाईफेक
आज (रविवारी) दुपारी गिरीश कुबेर यांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजता वृत्तपत्रांचे मनोरंजनीकरण अशा विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी जात असताना कुबेर यांच्यावर शाई फेकल्याचा प्रकार घडला. या घटनेत एका पोलिसाचा गणवेश शाईने खराब झाल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपूर्वी कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ (Renaissance State Book) या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर छापून कुबेर यांना नेमके काय साध्य करायचे आहे, असा सवाल अनेक राजकीय पक्षांनी तसेच विविध संघटनांनी विचारला गेला होता. तसेच या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीदेखील करण्यात आली होती. यामुळेच शाईफेक झाली असावी, असा कयास लावला जात असून परिसरातदेखील याबाबत चर्चा आहे.
हेही वाचा - Sahitya Sammelan 2021 : संभाजी ब्रिगेडकडून गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक