नाशिक हे धार्मिक आणि अध्यात्मिक शहर म्हणून ओळखले जाते. नाशिकमधील नवश्या गणपती Nashik Navshya Ganapati हे प्रसिद्ध जागृत देवस्थान मानले जाते. हा गणपती नवसाला पावतो, अशी भाविकांची मान्यता आहे. गोदावरी नदीच्यातीरी पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात Navshya Ganapati Temple प्रसन्न अशी श्री गणेशाची मूर्ती आहे. या मंदिराला तब्बल 300 वर्षांचा इतिहास आहे.
असा आहे नवश्या गणपतीचा इतिहास नाशिक येथे अनेक पुरातन पेशवेकालीन मंदिर आहेत. यातीलच एक म्हणजे नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेला नवश्या गणपतीचे प्राचीन मंदिर. गंगापूररोडवर सोमेश्वर मंदिराच्या अलीकडे हे मंदिर आहे. नारायणरावांच्या हत्येनंतर आनंदीबाईंना नाशिकजवळील चावंडस गावी ठेवण्यात आले. 1764 साली आनंदीबाईंना पुत्रप्राप्ती झाली. तेव्हा आनंदीबाईंच्या नावावरून सदर गावाचे नामकरण आनंदवली असे केले गेले. त्याच दरम्यान येथे गणपती मंदिर बांधले. तेच हे नवश्या गणपतीचे मंदिर, वीसपूर्वी मंदिराजवळ आनंदीबाईंच्या गढीचेही अवशेष होते आता केवळ मंदिर आहे. आजही या ठिकाणची शांतता आणि पावित्र्य टिकून आहे. नदी पात्राकडे पायऱ्या उतरत गेल्यावर पूर्वाभिमुख गणेश मंदिर आहे. सभामंडपात दोन्ही बाजूला अष्टविनायक, त्यापुढे गर्भगृहाला घुमटाकार शिखर अशी मंदिराची रचना आहे. संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थीस या मंदिरात मोठी गर्दी असते. नाशिकात दर्शनासाठी आलेले भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे वर्षभर या ठिकाणी भाविकांची गर्दी असते.
हजारो घंटा आहेत
गणेशाची मूर्ती चतुर्भुज असून त्यापकी वरील दोन हातात पाश आणि फुले आहेत, तर खालील एका हातात मोदक आणि दुसरा हात अभय मुद्रेत असून, मूर्तीच्या मागे चांदीचे नक्षीदार मखर आहे. ज्यांचा नवस पूर्ण होतो ते भाविक इथे घंटा बांधतात त्यामुळे सभामंडपाचे खांब हजारो घंटांनी भरून गेले आहेत.
पेशवेकालीन इतिहास
सन 1774 मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली.श्रीमंत माधवराव पेशवे यांचे नाशिकजवळील आनंदवली हे आजोळ होते. त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई या नवश्या गणपतीच्या भक्त होत्या. राघोबा दादा व आनंदीबाईंना 15 ऑगस्ट 1764 रोजी मुलगा झाला. त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले. या मुलाच्या जन्मप्रीत्यर्थ चांदवडसचे नाव बदलून आनंदवली ठेवण्यात आले. राघोबादादांनी आनंदवलीस मोठा राजवाडाही बांधला. या राजवाड्याच्या पश्चिमेस उभे राहिल्यास नवश्या गणपतीचे दर्शन होत असे.पेशवाई बुडाल्यानंतर आनंदवलीचा वाडाही जाळला. मात्र, परिसरातील मंदिरे शाबूत राहिली. नवश्या गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कारकीर्दीची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे, सन 1988 मध्ये कै. युवराज जाधव व आनंदवल्ली परिसरातील नागरिकांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. सन 1990 च्या कालखंडात संत गणेश बाबा यांच्या हस्ते मंदिरात अष्टविनायकाची स्थापना करण्यात आली.
सामाजिक बांधिलकी नवशा गणपतीमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच हजरत पीर सय्यद संझेशाह हुसैनी शहीद' यांची दरगाह आहे. दरगाह व मंदिर जरी शेजारी असले तरी त्यांच्यात आजतागायत कधीही वाद झाला नाही. या दोन्ही संस्थांमार्फत रामरहिम मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे ती धार्मिक कार्यक्रम करणारी संस्था नसून त्याद्वारे सामाजिक कार्य केले जाते.