नाशिक - बीसीसीआय आयोजित पुदुच्चेरी येथे आज पासून सुरू झालेल्या तेवीस वर्षाखालील महिलांसाठी टी-२० क्रिकेट सामन्यात महाराष्ट्र्राने सिक्कीमवर १०८ धवांनी दणदणीत विजय मिळवला. नाशिकच्या प्रियंका घोडके आणि साक्षी कानडी यांच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे हा महाराष्ट्राला हा विजय साध्य करता आला.
हेही वाचा - 'त्या' ऐतिहासिक कसोटीपूर्वी टीम इंडिया इंदोरमध्ये घेणार 'गुलाबी' प्रशिक्षण
महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २ बाद १८० धावांचा डोंगर उभा केला. यात नाशिकच्या यात प्रियंका घोडके हिने ५९ चेंडूत ६१ तर, साक्षी कानडीने ५० चेंडूत दमदार फलंदाजी करत ७६ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राच्या या आव्हानाचा पाठलाग करताना सिक्कीमचा संघ ९ बाद ७२ इतकीच मजल मारू शकला.