नाशिक - कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सरकारला अनेक नागरिक आणि संस्था मदत करत आहेत. साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ म्हणून सप्तश्रृंगी देवी तीर्थस्थान ओळखले जाते. राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी सप्तशृंगी देवी ट्रस्टकडून २१ लाखांची मदत देण्यात जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा... कोरोना विरोधातील लढ्याला टाटा ट्रस्टची 500 कोटींची मदत
जगभरातील २०३ देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. महाराष्ट्रमध्येही तीनशेहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सप्तश्रृंगी देवी ट्रस्टकडून कोरोनाच्या संबंधित कार्याला मदत म्हणून रुपये २१ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सदर रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे विश्वस्त संस्थेच्या वतीने हस्तांतरित करण्यात येणार आहे. सप्तश्रृंगीदेवी विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष जिल्हा सत्र व अतिरिक्त सत्र न्यायधीश गणेश देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.