नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. रविवारी एकाच दिवशी नाशिक जिल्ह्यात 105 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 61 रुग्ण हे नाशिक शहरातील आहेत. तर जिल्ह्यात 3 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी 105 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. मालेगावमध्ये कोरोनाबधितांचा आकडा कमी होत असतानाच नाशिक शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे.
आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात 1 हजार 971 कोरोनाबाधित आढळून आले असून 121 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 249 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 615 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना मुक्त रुग्णांची टक्केवारी 64.88 इतकी आहे. रविवारी नाशिक जिल्ह्यात 105 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये नाशिक शहर 61, नाशिक ग्रामीण -31, मालेगाव 13 समावेश आहे.