ETV Bharat / city

Nashik Rahadi Rangpanchami 2022 : नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी पारंपारिक रहाडी सज्ज

नाशिकात 300 वर्ष जूनी रहाडी रंगपंचमीची परंपरा ( Historical 300 Year Tradition Rahad Rang Panchami ) आहे. मात्र, गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे ती खंडीत झाली होती. यंदा कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे रहाडी परंपरा पुन्हा सुरु होत ( Nashik Rahadi Rangpanchami 2022 ) आहे.

Rahadi Rangpanchami
Rahadi Rangpanchami
author img

By

Published : Mar 21, 2022, 5:38 PM IST

नाशिक - कोरोना मुळे दोन वर्षे खंडित झालेली रहाडी परंपरा यंदा पुन्हा सुरू होत ( Nashik Rahadi Rangpanchami 2022 ) आहे. त्यामुळे नाशिकच्या रंगप्रेमी मध्ये उत्साह संचारला आहे. 300 वर्षांची पेशवेकालीन परंपरा असलेली रहाड संस्कृतीला आज ही विशेष महत्व ( Historical 300 Year Tradition Rahad Rang Panchami ) आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीला रंग खेळला जातो. पण, नाशिक याला अपवाद आहे. नाशिक मध्ये रंगपंचमीला रंग खेळण्याची परंपरा आहे. अन्य शहरापेक्षा नाशिकला रंगपंचमी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. याला पेशवेकालीन परंपरा आहे. रंगोत्सवासाठी इतिहासकालीन रहाडी खुल्या करण्यात येतात. नाशिककरही त्याचा मनमुराद आनंद लुटतात.

पेशवेकालीन परंपरा

पेशवेकाळापासून रंग खेळण्यासाठी जुने नाशिक व भागांत रहाडींची निर्मिती करण्यात आली होती. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून रहाडीचे खोदकाम काम सुरू होते. रंगपंचमीच्या आदल्या दिवसांपर्यंत स्वच्छता करून त्यात स्वच्छ पाणी भरून ठेवले जाते. रंगपंचमीच्या दिवशी त्यात रंग तयार करून टाकले जातात. त्यानंतर विधिवत पूजा करून नागरिकांना रंग खेळण्यासाठी रहाडी खुल्या करण्यात येतात. या पेशवेकालीन रहाडीत पाणी आणि रंग मिसळून जलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा होते. या रहाड संस्कृतीला मोठा इतिहास आहे.

रहाडी परंपरेबद्दल माहिती देताना पुजारी अविनाश दीक्षित

इथे आहे रहाडी

नाशिक शहरात तिवंधा चौक, शनी चौक, दिल्ली दरवाजा, तांबट अळी, मधली होळी अशा ठिकाणी रहाडी आहेत. यंदा सहाही रहाडी उघडण्यात आल्या आहेत. साधारणपणे 25 बाय 25 फुट आणि 8 फूट खोलीच्या या रहाडी आहेत. या रहाडीत वापरणारा रंग हा पूर्णपणे नैसर्गिक असतो. हा रंग इतका पक्का असतो की, एकदा यात उडी मारली तर दोन ते तीन दिवस हा निघत नाही. हजारो नाशिककर या रहाडीत उड्या मारून रंगपंचमीचा साजरी करतात.

नैसर्गिक रंग

रहाडीत वापरणारा रंग पाने, फुले, हळद, कुंकू यांच्या मिश्रणापासून पाच तास एका भांड्यात गरम करुन तयार केला जातो. रहाडीच वैशिष्ट्य म्हणजे रंगपंचमी साजरी झाल्यानंतर ती पुरताना प्राचीन अशा असणाऱ्या बल्याचांच ( सागवानी लाकडाचे मोठे मोठे ओंडके ) वापर केला जातो. रहाडीत आधीच्या रंगाचे पाणी अर्ध रहाड भरलेली अशा पद्धतीने ठेवून त्यावर उसाचे चिपाड व त्यावर माती या पद्धतीने पुरली जाते.

हेही वाचा - Katraj Dairy Election Result : कात्रज दूध संघावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.