ETV Bharat / city

गुन्हेगारी रोखण्यासाठी नाशकात पोलिसांकडून नाकाबंदी; गर्दीच्या ठिकाणी गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता - nashik crime

दिवाळीनिमित्त बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. हीच संधी साधून चोरटे बॅग लिफ्टिंग, चेन स्नाचिंग, पाकीटमारी करत आहेत. या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांनी शहरात ठिकाणी नाकेबंदी सुरू केली आहे. बाजारपेठांमध्ये चोरीच्या घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Nashik police using barricades to prevent crime in city
नाशकात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी
author img

By

Published : Nov 6, 2020, 7:54 PM IST

नाशिक - शहरामध्ये दिवसेंदिवस घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी सुरू केले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस स्टेशन अंतर्गत शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात येत आहे. संशयित वाहनांची तपासणी करून कागदपत्रे, परवाना आदींची तपासणी करण्यात येत आहे.

गर्दीत चोरीच्या घटनांवर वचक बसवण्यासाठी प्रयत्न -

दिवाळीनिमित्त बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. हीच संधी साधून चोरटे बॅग लिफ्टिंग, चेन स्नाचिंग, पाकीटमारी करत आहेत. या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांनी शहरात ठिकाणी नाकेबंदी सुरू केली आहे. बाजारपेठांमध्ये चोरीच्या घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमधील १२ सराईत गुन्हेगार २ वर्षांसाठी तडीपार

परिवहन विभागावर ढकलली जबाबदारी -

नियमांवर बोट ठेवत पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी अधिकारांची जाणीव करून देत शहरातील वाहतूक पोलिसांची जबाबदारी काढून घेत परिवहन विभागाकडे उंगली निर्देश केला आहे. त्यामुळे फक्त अपवादात्मक ठिकाणी वाहतूक पोलीस दिसत असून शहरातील इतर सिग्नलवर आनंदीआनंद दिसून येत आहे.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना केली अटक; 100 किलो चांदीसह पाऊण किलो सोने जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.