ETV Bharat / city

नाशिक : ‘हेल्मेट नाही-सहकार्य नाही’, कारवाईचा पोलीस आयुक्तांचा इशारा - नाशिक पोलीस आयुक्त न्यूज

चालकांकडे हेल्मेट नसल्यास संबंधित कार्यालयांमध्ये प्रवेश नाकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विनाहेल्मेट दुचाकीस्वार कार्यालयांच्या परिसरात आल्यास संबंधित कार्यालयीन प्रमुखावर कारवाईची तरतूद पोलीस आयुक्तांनी केली आहे. त्यात संबंधितांवर दंडात्मक किंवा 8 दिवसांपर्यंत कारागृहात रवानगीच्या शिक्षेची तरतूद आहे.

नाशिक हेल्मेट सक्ती
नाशिक हेल्मेट सक्ती
author img

By

Published : Nov 9, 2021, 5:27 PM IST

Updated : Nov 9, 2021, 5:56 PM IST

नाशिक - ‘हेल्मेट नाही-सहकार्य नाही’ या मोहिमेंतर्गत हेल्मेट नसलेल्यांना कार्यालयाच्या आवारात प्रवेश मिळाल्यास संबंधित आस्थापना, कार्यालयीन-विभाग प्रमुखांवर कारवाई होणार आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी यासंबंधी शहरातील खासगी, निमशासकीय व शैक्षणिक संस्थाचालकांना पत्र पाठवून या आस्थापनांच्या प्रमुख अधिकाऱ्याचे नाव, पद आणि संपर्क क्रमांकाची माहिती 15 नोव्हेंबरपर्यंत मागवली आहे. तसे आदेशच त्यांनी काढले आहेत.

संबंधितांवर दंडात्मक किंवा 8 दिवसांपर्यंत कारागृहात रवानगी

पोलीस आयुक्त पांडे यांनी 6 नोव्हेंबरपासून शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, कोचिंग क्लासेस, सर्व वाहनतळ, औद्योगिक परिसर, शासकीय, निमशासकीय कार्यालये, कॅन्टोंमेन्ट बोर्ड येथे येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती केली आहे. इमारतींच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही बसवण्यास सांगितले असून विनाहेल्मेट दुचाकीस्वार कार्यालयात येणार नाही, अशी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. या परिसरात येणाऱ्या चालकांकडे हेल्मेट नसल्यास संबंधित कार्यालयांमध्ये प्रवेश नाकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विनाहेल्मेट दुचाकीस्वार कार्यालयांच्या परिसरात आल्यास संबंधित कार्यालयीन प्रमुखावर कारवाईची तरतूद पोलीस आयुक्तांनी केली आहे. त्यात संबंधितांवर दंडात्मक किंवा 8 दिवसांपर्यंत कारागृहात रवानगीच्या शिक्षेची तरतूद आहे.

कारवाईची तरतूद

दिवाळीमुळे शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह शैक्षणिक संस्था कार्यालये बंद होती. सोमवारपासून (दि. 8) ती पुन्हा सुरु झाली आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्त पांडे यांनी शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक संस्थांमध्ये पत्र पाठवून कार्यालयीन प्रमुखाची माहिती मागवली आहे. ही माहिती 15 नोव्हेंबरपर्यंत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार या कार्यालयांमध्ये विनाहेल्मेट दुचाकीस्वार शिरल्यास संबंधित कार्यालयीन प्रमुखावर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

Last Updated : Nov 9, 2021, 5:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.