नाशिक - शहरातील कामटवाडा परिसरात भाग्यश्री अपार्टमेंटमध्ये सोमवारी मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने दोन दुचाकी जाळल्या आहेत. अपार्टमेंटच्या खालीच दुचाकी जाळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने कामटवाडा परिसरात भीतीचे वातावरण आहे. भाग्यश्री अपार्टमेंटमध्ये रहाणाऱ्या महिला जसबीर कौर संधू यांचीही दुचाकी यात जाळण्यात आली आहे. त्यांनी आपल्या अपार्टमेंटच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीवर आरोप केले आहेत. यानंतर स्थानिक नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर अंबड पोलिसांनी त्या संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहे.