ETV Bharat / city

Nashik Oxygen Storage : १४० मेट्रिक टनचा ऑक्सिजन प्लॅंट तयार करणारी नाशिक राज्यातील पहिली महापालिका - नाशिक ऑक्सिजन प्लँट क्षमता

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी नागरिकांचे मृत्यू झाल्याचा अनुभव पाठीशी असल्याने पालिकेने आता तब्बल १४० मेट्रिक टन मेडिकल ( Nashik Oxygen Plant ) ऑक्सिजन तयार केला आहे. राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लँट उभारणारी नाशिक मनपा ( Nashik Municipal Corporation ) ही राज्यातील पहिली संस्था ठरली आहे.

Nashik Oxygen Storage
Nashik Oxygen Storage
author img

By

Published : Jan 11, 2022, 3:33 PM IST

नाशिक - जिल्ह्यात दररोज हजाराच्या पटीने कोरोना रुग्णसंख्या ( Nashik Conrona Patient increase ) वाढत असल्याने पालिका प्रशासन अधिक अलर्ट झाले आहे. गेल्या लाटेत ऑक्सिजन अभावी नागरिकांचे मृत्यू झाल्याचा अनुभव पाठीशी असल्याने पालिकेने आता तब्बल १४० मेट्रिक टन मेडिकल ( Nashik Oxygen Plant ) ऑक्सिजन तयार केला आहे. राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लँट उभारणारी नाशिक मनपा ( Nashik Municipal Corporation ) ही राज्यातील पहिली संस्था ठरली आहे.

महाराष्ट्रातला सर्वात मोठा सरकारी ऑक्सिजन प्लॅट -

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक नागरिकांनी घरात, हॉस्पिटलच्या दारात तर अनेकांनी वाहनात आपला जीव गमविल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, आता नाशिक जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांना पुरवठा केला जाऊ शकतो, इतक्या मोठ्या प्रमाणतला ऑक्सिजन प्लॅट नाशिक महानगर पालिकेने उभारला आहे. पालिकेकडे या पूर्वी केवळ १३ मेट्रिक टन इतक्या ऑक्सिनची क्षमता होती. मात्र, आता पालिकेने तब्बल ३ कोटी रुपये खर्च करून १४० मेट्रिक टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लॅट उभारला आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा सरकारी ऑक्सिजन असलेला हा प्लॅट नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ऑक्सिनज पुरवठा करू शकेल, असा दावा पालिका आयुक्तांनी केला आहे.

'गरज भासल्यास राज्याला ऑक्सिजन देऊ' -

पालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याहस्ते काल या प्लॅटचे उदघाटन करण्यात आले. विशेष म्हणजे नाशिक शहारारील पालिकेच्या सर्व रुग्णलयाबरोबरच गरज पडल्यास खासगी रुग्णलयांनादेखील या प्लॅटमधून ऑक्सिजन पुरवला जाऊ शकतो. तसेच गरज भासल्यास राज्याला ऑक्सिजन दिला जाणार आहे. पालिकेने सरकारच्या गाइडलाईन नुसार ४ ते ५ पट ऑक्सिजनसाठा करण्यास सुरुवात केली आहे. काल पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत १२० मेट्रिक टन इतका बफर स्टॉक पालिकेने केला आहे. पालिकेच्या या तत्परतेमुळे आता नाशिकरांना ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागणार नाही, अशी आशा आहे. मात्र, नागरिकांनी ही वेळ येऊ न देता नियम पाळणे गरजेचे आहे.

हेही वाचा - Corona Update : भारतात कोरोना रुग्णांमधे घट, 1.68 लाख नवीन रुग्णांची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.