ETV Bharat / city

Nashik CP Revoked Order : नाशिकच्या नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी पांडये यांचा भोंग्यांबाबतचा 'तो' आदेश केला रद्द - नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे

नाशिकचे माजी पोलीस आयुक्त दीपक पांडये ( Deepak Pandye ) यांचा भोंग्याबाबतचा मनाई आदेश नवे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी रद्द ( Nashik CP revoked order regarding loudspeaker issue ) केला आहे. भोंग्याबाबतची शहरातील सर्व परिस्थिती विचारात घेता स्वतंत्र आदेशाची गरज नसल्याचे नव्या पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.

Nashik CP Revoked Order
नाशिक लाऊडस्पीकर वरील आदेश रद्द
author img

By

Published : Apr 28, 2022, 2:36 PM IST

Updated : Apr 28, 2022, 8:00 PM IST

नाशिक - माजी पोलीस आयुक्त दीपक पांडये यांचा भोंग्याबाबतचा मनाई आदेश नवे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे ( Nashik CP Jayant Naiknavre ) यांनी रद्द ( Nashik CP revoked order regarding loudspeaker issue ) केला आहे. भोंग्याबाबतची शहरातील सर्व परिस्थिती विचारात घेता स्वतंत्र आदेशाची गरज नसल्याचे नव्या पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.

3 तारखे पर्यंत भोंग्याचे परवानगी घेण्याचे दिले होते आदेश - 17 एप्रिलला दीपक पांडये यांनी भोंग्याबाबत मनाई आदेश जारी केला होता.या आदेशानुसार 3 मेपर्यंत भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागणार होते. मात्र नवनियुक्त पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी नवीन आदेश काढून 17 एप्रिलचे आदेश रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. 17 एप्रिल रोजी तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पांडये यांनी सर्व धर्मियांना भोंगे आणि इतर साउंड सिस्टीम वाजवण्यासाठी पूर्व परवानगीचा आदेश दिला होता. नवे आयुक्त नाईकनवरे यांनी पदभार स्वीकारल्यावर अवघ्या पाच दिवसांनी पांडये यांचा आदेश रद्द केला आहे. नाशिक शहरात स्वतंत्र आदेशाची गरज दिसत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल असे त्यांनी आदेशात म्हटले आहे.

पांडये यांनी काढला होता आदेश - धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून नाशिकचे माजी पोलीस आयुक्त दीपक पांडये ( Deepak Pandey order on loudspeaker ) यांनी धार्मिक प्रथा परंपरा, रीतिरिवाज आणि कायदा सुव्यवस्थेचा विचार करीत भोंगे लावण्याच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंगवास किंवा थेट हद्दपार करण्याचे आदेश ( Nashik order on loudspeaker ) काढले होते. यात सर्व धार्मिक स्थळांना भोग्यांसाठी ( Deepak Pandey order ) 3 मे पर्यंत पोलीस आयुक्तालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच, भोंगे लावून नमाज म्हणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रचलित ध्वनी प्रदूषण विषयक नियम पाळावे लागणार आहे.

हेही वाचा - Yogi Govt On Bhonga : योगी सरकारचे भोंग्यांवर बुलडोजर! 11 हजार भोंगे हटवले

Last Updated : Apr 28, 2022, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.