नाशिक - महापालिकेच्या डाॅ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळती दुर्घटनेची चौकशी सुरु झाली असून, या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. टाकीत ऑक्सिजन रिफिलिंग करणे सुरु असताना अचानक लीकेज होऊन सर्वत्र पांढरा धुर बाहेर पडत असल्याचे चित्रीकरणात दिसत आहे. विभागीय आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली सात सदस्यीय समिती या दुर्घटनेचा तपास करत आहे. याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून ही तांत्रिक चूक होती की हलगर्जीपणा हे समोर येणार आहे. दरम्यान या दुर्घटनेतील मृताचा आकडा 24 वर पोहचला आहे.
नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना घटनाक्रम
- 11:55 मिनिटं - पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील, लिक्विड ऑक्सिजन टॅन्कमध्ये, ऑक्सिजन रिफिल करणारा टँकर पोचला.
- 12:03 मिनिटं - ऑक्सिजन टँकरमधून, ऑक्सिजन टॅन्कमध्ये, ऑक्सिजन रिफिल करण्यासाठी पाईप जोडणीला सुरुवात.
- 12:12 मिनिटं - टॅन्कमध्ये ऑक्सिजन भरण्यास सुरुवात, इनलेट कॉकजवळ प्रेशर वाढले. गळतीला सुरुवात.
- 12:13 मिनिटं - अवघ्या 1 मिनिटात प्रेशरचा दाब प्रचंड वाढला. लिक्विड गॅस झपाट्यानं बाहेर पडायला सुरुवात.
- 12:14 मिनिटं - पाहता पाहता, धुकं सदृश्य लिक्विड ऑक्सिजनचे अक्षरशः लोट, सर्व परिसरात पसरलं धुकंच धुकं.
- 12:15 मिनिटं - रुग्णालयातचा ऑक्सिजन पुरवठा खंडित.
- 12:16 मिनिटं - अग्निशमन यंत्रणेला रुग्णालय व्यवस्थापनानं केला कॉल.
- 12:25 मिनिटं - अवघ्या 9 मिनिटात, अग्निशमन जवानांची टीम दाखल.
- 12:26 मिनिटं - पाण्याची फवारणी सुरू.
- 12:28 मिनिटं - मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी प्रोटेक्ट मास्क लावून धुक्यात प्रवेश केला, गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू.
- 12:30 मिनिटं - गळती होत असलेला नॉब सापडला.
- 12:32 मिनिटं - गळती रोखण्यात यश.
- 12:34 मिनिटं - रुग्णालयात पोहचणारा लिक्विड ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू.
- 12:46 मिनिटं - पुरवठा सुरळीत करण्यात काही प्रमाणात यश, मात्र प्रेशर नियंत्रण राखण्यासाठी धडपड सुरू.
- 12:47 मिनिटं - अखेर प्रेशर नियंत्रणात आले.
ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईपर्यंत 22 रुग्णांचे प्राणवायू न मिळाल्याने,तर दुपारी अजून दोघांचा मृत्यू झाला. असे एकुण रुग्ण 24 रुग्ण दगावले आहेत.
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या बातम्या
निवृत्त पोलिसासोबत झालेल्या झटापटीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, बघा थरारक VIDEO
लॉजमधील हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ८ तरुणींसह १० जणांना अटक
नवी मुंबईत दोन भाऊ, बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला, छेड काढल्याची तक्रार केल्याने केला हल्ला
Maharashtralockdown : राज्यात कडक निर्बंध लागू, अशी आहे नवीन नियमावली
गोव्यात नाईट कर्फ्यू लागू, अशी आहे नवीन नियमावली
आता ५० वर्षावरील पोलीसांना "नो फील्ड,ओन्ली ऑफिस ड्युटी" - गृहराज्यमंत्री
कुर्डूवाडीत हिंदू तरुणाने निराधार ख्रिश्चन महिलेवर केले ख्रिश्चन पद्धतीने अंत्यसंस्कार
हेही वाचा - LIVE Updates : विरार रुग्णालय आग; चौकशीचे आदेश, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत..