ETV Bharat / city

PUBG Addiction : नाशिक : पबजी खेळत 12 वर्षाचा नागेश रेल्वेने नांदेडहून पोहचला नाशिकला - मोबाईल गेमचे व्यसन

मोबाईल गेम्सच्या आहारी गेल्याने ( Mobile Game Addiction ) अनेक लहान मुलांमध्ये त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. असाच एक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला. मोबाईलवर पबजी गेम खेळत असताना नांदेडमधील एक १२ वर्षीय मुलगा थेट नाशिकमध्ये ( Boy Reached Nashik While Playing PUBG ) पोहोचला. पोलिसांच्या सतर्कतेने त्याला पालकांच्या हवाली करण्यात आलं.

PUBG Addiction
पबजी खेळत 12 वर्षाचा नागेश रेल्वेने नांदेडहून पोहचला नाशिकला
author img

By

Published : May 7, 2022, 7:53 AM IST

नाशिक : मोबाईलवर पबजी गेम ( Mobile Game Addiction ) खेळता खेळता 12 वर्षाचा मुलगा नांदेडहून रेल्वेने थेट नाशिकरोडपर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार घडला ( Boy Reached Nashik While Playing PUBG ) आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तब्बल 24 तासांनंतर मुलाला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं.

अशी घडली घटना : नांदेड जिल्ह्यातील बिलोरी तालुक्यातील हरनाळा येथील नागेश जाहुरे (वय 12) हा बुधवारी सकाळी अंगणात मोबाइल वर पबजी गेम खेळत होता. मुलगा मोबाईलवर आहे हे बघून घरच्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. मात्र नागेश खेळता- खेळता नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचला व सकाळी साडे दहाच्या नांदेड -मुंबई तपोवन एक्सप्रेस ( Nanded Mumbai Tapovan Express ) मध्ये बसला. नागेश घरी दिसत नाही म्हणून घरच्यांची शोधाशोध सुरू झाली. सर्वत्र शोधल्यानंतर ही नागेश सापडला नसल्याने घरच्यांनी रेल्वे स्थानक गाठले. रेल्वे पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीची तपासणी केली. यात एक बारा वर्षाचा मुलगा चौकटी शर्ट घातलेला दिसून आला. त्याच्या हातात फोन ही होता. तो नागेश असल्याचे वडिलांनी सांगितलं.

पोलिसांचे आवाहन

पोलिसांनी बोलतं केलं : पोलिसांनी तात्काळ पुढील रेल्वे स्थानकावरील पोलिसांना मुलाचा फोटो आणि माहिती पाठवली. यात बुधवारी सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान नागेश नाशिक रेल्वे पोलिसांना सापडला. तपोवन एक्सप्रेसमधून एक मुलगा गर्दीचा फायदा घेऊन लपत जात असतांना पोलिसांनी त्याला पाहिलं. सुरवातीला तो खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला बोलते केलं. त्याच्या वडिलांशी संपर्क करून पोलिसांनी त्याला त्यांच्या ताब्यात दिल. 24 तासानंतर नागेश सापडल्याने घरच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पालकांनी काळजी घ्यावी : लॉकडाऊनमुळे मुलांच्या हातात मोबाईल दिसू लागले. मात्र आता परिस्थिती पूर्ववत होत असताना आपली मुले मोबाईलमध्ये काय करताहेत याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पबजी आणि इतर मोबाईल गेमपासून पालकांनी मुलांना रोखलं पाहिजे, असं नाशिक रोड पोलिस ठाण्याचे अधिकारी महेश कुलकर्णी यांनी सांगितले.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये पबजी गेम खेळत असताना तरुणाला आला झटका; उपचारादरम्यान मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.