नाशिक - नाशिकच्या मेहेर सिंगल परिसरात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावे यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं. एकीकडे रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येते आहे. मात्र दुसरीकडे रेमडेसिवीर मिळत नसल्याने नातेवाईक संतप्त झाले आहेत.
आज याच मुद्यावर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. आंदोलनादरम्यान नागरिकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रोज 3 ते 4 हजार नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णालयात ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
रेमडेसिवीरचा काळाबाजार-
नाशिकमध्ये कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढली असून कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी देखील वाढली आहे. इंजेक्शन मिळावे यासाठी नातेवाईक तासंतास उन्हातानात रांगेत उभे राहत आहे. याचाच फायदा घेत काही संधीसाधू लोक नकली रेमडेसिवीरचा काळाबाजार करत नागरिकांची फसवणूक करत आहे. कुठे रेमडेसिवीरसाठी आवाच्या सव्वा रुपयांची मागणी कार्य करत आहे तर कुठे नकली रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जात आहे.
हेही वाचा - राज्यात आठवडाभर लॉकडाऊन लागण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी बोलाविली सर्वपक्षीय बैठक