ETV Bharat / city

गोदावरी नदीपात्रात मोटरसायकल पडून दोन मित्रांचा मृत्यू - two died after motorcycle fell in river

गोदावरी नदीपात्रात मोटारसायकल पडून दोघा मित्रांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही जळगाव येथील असल्याचे समजते. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

River
नदी
author img

By

Published : Apr 30, 2022, 1:21 PM IST

नाशिक - गोदावरी नदीपात्रात मोटारसायकल पडून दोघा मित्रांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही जळगाव येथील असल्याचे समजते. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - Cyber Police Action : सावधान; सोशल मीडियावर अश्लिल फोटो, व्हिडिओ शेअर केल्यास घडू शकते जेलवारी

जळगाव येथील दोन मित्र कामानिमित्त नाशिकला आले होते. ते पंचवटी परिसरात थांबले होते. 29 तारखेला मध्यरात्री ते पंचवटी कॉलेजसमोरील गोदावरी नदीपात्र परिसरातून जात असताना अंधारात त्यांना रस्त्याचा अंदाज न आल्याने ते मोटरसायकलसह नदी पात्रात पडले. रात्रीची वेळ असल्याने त्यांना मदत मिळू न शकल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही.

हेही वाचा - Nashik Heat stroke : धक्कादायक! नाशिकमध्ये उष्माघाताचे तीन बळी?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.