ETV Bharat / city

मनमाड-नांदगाव रस्त्यावर अपघात; एक ठार, तीन गंभीर जखमी - motorcycle accident

मनमाड नांदगाव रस्त्यावरील हिसवळ गावाजवळ अधिशय धोकादायक वळण असून याठिकाणी सतत अपघात होत असतात. सोमवारी झालेला अपघातही याच ठिकाणी झाला असुन अपघातात दोन्ही मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला.

Accident on Manmad Nandgaon road
मनमाड नांदगाव रस्त्यावर हिसवळ गावाजवळ मोटरसायकलचा अपघात
author img

By

Published : Mar 10, 2020, 9:23 AM IST

Updated : Mar 10, 2020, 9:33 AM IST

नाशिक - मनमाड-नांदगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात एक जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाला. मनमाड-नांदगाव रस्त्यावर हिसवळ गावाजवळ ही घटना घडली. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी मालेगाव येथे पाठवण्यात आले आहे.

मनमाड नांदगाव रस्त्यावरील हिसवळ गावाजवळ मोटारसायकलचा अपघात...

हेही वाचा... 'वादळी वाऱ्यासह पाऊस आला अन् गहू, ज्वारीसाठी केलेला खर्च क्षणार्धात मातीत गेला'

हिसवळ गावाजवळ झालेल्या या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला. लक्ष्मण गुंजाळ असे मृत युवकाचे नाव आहे. तर अंकुश मढे, रोहित विंचू, गौतम नवले अशी जखमी तरुणांची नावे आहेत. मनमाड नांदगाव रस्त्यावर हिसवळ गावाजवळ अधिशय धोकादायक वळण असून याठिकाणी सतत अपघात होत असतात. सोमवारी झालेला अपघातही याच ठिकाणी झाला असुन अपघातात दोन्ही मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. रात्री उशीरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरु होते.

हेही वाचा... सूर्य तिकडे उगवेल म्हणून ते गेले, पण झाले उलटच.. अजित पवारांचा टोला

Last Updated : Mar 10, 2020, 9:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.