ETV Bharat / city

मातृदिन विशेष - कुटुंबाच्या आधारामुळे 21 दिवसांनंतर कोरोनामुक्त होत, रुग्णसेवेत झाल्या दाखल

author img

By

Published : May 9, 2021, 12:05 PM IST

Updated : May 9, 2021, 1:55 PM IST

नाशिक जिल्हा रुग्णालयात अधिसेविका असलेल्या शमा माहुलीकर यांनी कोरोना काळात रुग्ण सेवेसाठी स्वतःला वाहून दिले आहे, कुटुंबाच्या आधारामुळे 21 दिवसांनंतर कोरोनामुक्त होत, त्या परत रुग्णसेवेत दाखल झाल्या आहेत.

मातृदिन विशेष
मातृदिन विशेष

नाशिक - कोरोना काळात आरोग्य विभागात काम करणाऱ्या प्रत्येकाचे काम कौतुकास्पद आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात अधिसेविका असलेल्या शमा माहुलीकर यांनी देखील कोरोना काळात रुग्ण सेवेसाठी स्वतःला वाहून दिले आहे, एकीकडे रुग्ण सेवा दुसरी कुटुंबाची जबाबदारी या दोघांची सांगड घालत त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. कुटुंबातील पती आणि मुलांच्या आधारामुळे कोरोनामुक्त होत, शमा पुन्हा 21 दिवसांनंतर रुग्ण सेवेत दाखल झाल्या आहेत.

कुटुंबाच्या आधारामुळे 21 दिवसांनंतर कोरोनामुक्त होत, रुग्णसेवेत झाल्या दाखल

रुग्ण सेवेसोबत प्रत्येकाला मानसिक आधार दिला आहे.

'आई' ही देवाची सर्वात सुंदर निर्मिती आहे, जी मुलांवर कुठल्याही स्वार्थाशिवाय प्रेम करत असते. मुलांच्या प्रत्येक सुखा दुःखात त्यांच्या पाठीशी उभी असते. आईची जागा जगात कोणीच घेऊ शकत नाही असे म्हटले जाते. 9 मे हा दिवस जागतिक मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. आज महिलांनी आईची भूमिका पार पाडत असतांना स्वतःला सर्वच क्षेत्रात सिद्ध करून दाखवले आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात अधिसेविका असलेल्या शमा माहुलीकर ह्या आपल्या मुलांसाठी सुपर वुमन आहेत. गेल्या 35 वर्षांपासून त्या रुग्णसेवेत कार्यरत आहे. 1993 मधील मुंबईतील बॉम्ब ब्लास्ट असो की, आताचे कोरोनाचे महामरीचे संकट अशा कठीन काळात त्यांनी रुग्ण सेवेसोबत प्रत्येकाला मानसिक आधार दिला आहे.

कोरोनामुक्त होत 21 दिवसानंतर रुग्ण सेवेत दाखल

कोरोना काळात सर्वात जास्त ताण आरोग्य यंत्रणेवर आला. मात्र अशा कठीण परिस्थितीत चांगली रुग्णसेवा देत सरकारी रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. शमा माहुलीकर याही त्यातील एक, आपले कर्तव्य बाजावत असतांना शमा या कोरोनाबाधित झाल्या होत्या, उपचारा दरम्यान त्यांची प्रकृती खालावली. मात्र जिल्हा रुग्णालयातील स्टाफ आणि कुटुंबाची खंबीर साथ, मुलांचे सकारात्मक आधार यामुळे 14 दिवसानंतर कोरोनामुक्त होत 21 व्या दिवशी पुन्हा रुग्ण सेवेत दाखल झाल्याचे शमा माहुलीकर यांनी सांगितले.

कुटुंबाला शमा यांचा अभिमान आहे

'कोरोना काळात शमा माहुलीकर यांनी जेवढी रुग्णांची काळजी केली तेवढीच कुटुंबाचीही घेतली आहे. या काळात त्यांना मी आणि मुलांनी देखील मदत केली. त्या कामावरुन येण्याआधी आम्ही आर्धा स्वयंपाक करू ठेवत त्यांना मदत करत होतो. त्यांनी आपल्या कामात कधीच हलगर्जीपणा केला नाही. 35 वर्षांपासून जी रुग्ण सेवा करत आहे, ती अगदी मनापासून करत असल्याने, त्यांचा आम्हाला अभिमान आहे'. असे शमा माहुलीकर यांचे पती विठ्ठल माहुलीकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, तीन प्रकरणांमध्ये एसीबीकडून गोपनीय चौकशी

Last Updated : May 9, 2021, 1:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.