ETV Bharat / city

MNS Challenge to Police : तुरुंगात टाकले तरी चालेल, भोंगे वाजणारच; मनसेचे पोलिसांना आव्हान - भोंगे वाजणारच

आम्ही इतरांच्या आदेशापेक्षा राज ठाकरे यांचा आदेश आम्ही पळतो. पोलिसांनी गुन्हे दाखल केले तरी आम्ही त्याला घाबरणार नाही, आम्हाला तुरुंगात टाकले तरी 3 मेनंतर मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर त्याच्या समोर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा वाजणारच, असे आव्हान मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पोलिसांना दिला ( MNS Challenge to Police ) आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.

मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर
मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर
author img

By

Published : Apr 19, 2022, 3:21 PM IST

नाशिक - आम्हाला तुरुंगात टाकायचे असेल तर जरूर टाका, आम्ही आमचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांचे आदेश पाळणारच, असा इशारा नाशिक मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी दिला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडे ( Nashik CP Deepak Pandey ) यांनी भोंग्याबाबत काढलेल्या आदेशाला मनसेने आव्हान दिले ( MNS Challenge to Police ) आहे.

बोलताना दिलीप दातीर

मशिदीवरील भोंग्यावरून अजान दिली जात असल्याने राज ठाकरे यांनी भोंगेखाली उतरण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला. राजकीय, सामाजिक वातावरण तणावपूर्ण बनले आहे. भोंगे न उतरल्यास मशिदीसमोर स्पीकर लावून हनुमान चालीसा म्हटली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तांनी परवानगी शिवाय भोंगे वाजवण्यात सक्त मनाई केली असून विनापरवानगी भोंगे लावल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

तुरुंगात टाकले तरी चालेल - आम्ही इतरांच्या आदेशापेक्षा राज ठाकरे यांचा आदेश आम्ही पळतो. पोलिसांनी गुन्हे दाखल केले तरी आम्ही त्याला घाबरणार नाही, आम्हाला तुरुंगात टाकले तरी 3 मेनंतर मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर त्याच्या समोर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा वाजणारच, असा इशारा दिलीप दातीर यांनी दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.

काय आहे आयुक्तांचे आदेश - मशिदीपासून 100 मीटरच्या आत पाच वेळच्या नमाजच्या वेळी कुणालाही भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणता येणार नाही. ज्यांना 100 मीटर दूर अंतरावर म्हणायचे असेल त्यांना 3 मेपर्यंत परवानगी घ्यावी लागणार आहे. ध्वनी प्रदूषणाविषयी नियमांचे पालन करूनच हनुमान चालीसा किंवा नमाज पठण करावे लागणार आहे, औद्योगिक क्षेत्रासाठी 70 ते 75 डेसिबल, व्यावसायिक क्षेत्र 55 ते 65 डेसीबल, निवासी क्षेत्र 45 ते 55 डेसीबल तसेच न्यायालय रुग्णालय, शासकीय कार्यालयाने, शाळा असलेल्या शांतता झोनमध्ये 40 ते 50 डेसीबलपर्यंत आवाजाची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

होऊ शकतो तुरंगवास - धार्मिक प्रथा परंपरा, रीतिरिवाज आणि कायदा सुव्यवस्था यांचा विचार करत भोंगे लावण्याच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंगवास किंवा थेट हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. हनुमान चालीसा म्हणू इच्छिणाऱ्यांना 3 मेपर्यंत पोलीस आयुक्तालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा - खबरदार..! विनापरवानगी भोंगे लावल्यास होणार कारवाई, नाशिक पोलीस आयुक्तांचा आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.