नाशिक - भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात गेल्या 30 वर्षांपासून एका गोडाऊनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा कैद करून ठेवल्याप्रकरणी त्यांची आमदारकी रद्द होण्याची टांगती तलवार आहे.
राज्यपालांचे प्रधान सचिवांना पत्र
छावा क्रांतीवीर सेनेने या संपूर्ण प्रकरणाबाबत आंदोलन पुकारले होते. यानंतर आंदोलनाची दखल घेत राज्यपालांनी राज्य सरकारचे प्रधान सचिव यांना पत्र पाठवून राधाकृष्ण विखे पाटील यांची आमदारकी का रद्द करू नये, असा सवाल उपस्थित करत पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे छावा क्रांतीवीर सेनेच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.
पुढील कार्यवाहीचे आदेश
नगर जिल्ह्यातील राहातामध्ये आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात गेल्या 30 वर्षांपासून एका गोडाऊनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा कैद करून ठेवल्याचा आरोप करत छावा क्रांतीवीर सेनेने आंदोलन पुकारले होते. यानंतर आंदोलनाची दखल घेत राज्यपालांनी राज्य सरकारचे प्रधान सचिव यांना पत्र पाठवून राधाकृष्ण विखे पाटील यांची आमदारकी का रद्द करू नये, असा सवाल उपस्थित करत पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटलांवर कारवाई होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.