नाशिक :- शेती पूरक व्यवसायात महाराष्ट्र राज्य हे पुढे आहे. राज्यातील धार्मिक, पर्यटन क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ रोवून शेतीकडे वळणाऱ्या युवा पिढीला सलाम करावासा वाटतो. आधुनिक पद्धतीने शेती करून अवकाळी पाऊस यामुळे सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला येतो ते नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक कृषी उत्पन्न वाढवुन शेतकऱ्यांना फायदा कसा होईल याकडे लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat singh koshyari visited turmeric plant) यांनी व्यक्त केले.


हळदी प्लांटला राज्यपाल कोशियार यांची भेट
कमी जागेत सेंद्रिय पध्दतीने जास्त उत्पादन घेण्याचा ए. एस.अॅग्री समुहाने उभारलेला प्रकल्प उल्लेखनीय आहे. अशाच प्रकल्पांच्या माध्यमातून सामान्य शेतकर्यांना त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.वैतरणा-त्र्यंबकेश्वर महामार्गावरील हळदी प्लांटला रविवारी राज्यपाल कोशियार यांनी भेट दिली त्या प्रसंगी ते बोलत होते.अत्यंत कमी क्षेत्रावर जास्तीचे उत्पादन घेऊन लागवड खर्च कमी करण्यासाठी इजराईल पद्धतीने राज्यात २७ ठिकाणी ऍग्री एक्वा लॅप या कंपनीने प्लांट सुरू केले आहे. कमी क्षेत्रातील शेतकऱ्यांना देखील यातून मोठा फायदा होणार असून एकदाच केलेली डेव्हलपमेंट मटेरियल तब्बल ७० वर्षापर्यंत कामी पडू शकते. असा विश्वास कंपनीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत झाडे यांनी व्यक्त केला.

प्रयोगांची घेतली माहिती
कमी जागेत सेंद्रिय पध्दतीने जास्त उत्पादन घेण्याचा ए. एस.अॅग्री समुहाने उभारलेला प्रकल्प उल्लेखनीय आहे. अशाच प्रकल्पांच्या माध्यमातून सामान्य शेतकर्यांना त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.ए. एस.अॅग्री व कल्याणी वेअर हाऊसच्या प्रकल्पाच्या तीन पॉलीहाऊसला राज्यपाल यांनी भेट दिली. त्यावेळी त्या पॉलीहाऊस मध्ये उत्पादित करण्यात आलेल्या हळद, तांदूळ, केळी, फळभाज्या, मत्स्यपालन अशा विविध पिकांवर व प्रकल्पांवर करण्यात आलेल्या प्रयोगांची तेथील संचालक मंडळातील हाडोळ यांनी यावेळी माहिती दिली.मत्स्यपालन, हळद उत्पादन, बागायती पिके यांची बारकाईने निरीक्षण करून कृषी अधिकारी यांच्याकडून राज्यपालांनी माहिती समजून घेतली. इस्त्राईल धर्तीवर केलेल्या शेती तंत्रज्ञान विकसित पद्धतीचा वापर राज्यात इतर जिल्ह्यांत करता या दृष्टीने विचार केला जाईल असा विश्वास त्यांनी संबंधित अधिकारी यांना दिला.राज्यातील राजकीय प्रश्न उपस्थित करण्यात आल्यावर त्यांनी उत्तर देणे टाळले.
हेही वाचा - प्रधान सल्लागारानेच सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे उडविली; नाना पटोलेंना मानसिक उपचारांची गरज - चंद्रशेखर बावनकुळे