ETV Bharat / city

नाशकातील अनुराधा सिनेमागृहाला भीषण आग; कारण अस्पष्ट - fire brigade in nashik

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले, जवळपास चार बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. सिनेमागृह बंद असल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

सिनेमागृहातील छत आणि खुर्च्या जाळून खाक झाल्या आहेत.
author img

By

Published : Aug 17, 2019, 12:56 PM IST

Updated : Aug 17, 2019, 1:17 PM IST

नाशिक - नाशिकरोड येथील अनुराधा सिनेमागृहाला शनिवारी सकाळी अचानक आग लागली. हे सिनेमागृह गेल्या आठ वर्षापासून बंद असल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या सिनेमागृहाचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या चार बंबानी ही आग विझवली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नाशिक येथील अनुराधा सिनेमागृहाला भीषण आग लागली.

गेल्या 40 वर्षांपासून अनुराधा सिनेमागृह नाशिक रोड भागात प्रसिद्ध आहे. मात्र, मागील आठ वर्षांपासून हे सिनेमागृह बंद आहे. शनिवारी सकाळी 9 वाजता अचानक या सिनेमागृहाला आग लागली. आग इतकी भीषण होती, की सिनेमागृहातून निघणारा धूर हा दूरपर्यंत दिसत होता.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले, जवळपास चार बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. सिनेमागृह बंद असल्याने सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, सिनेमागृहातील छत आणि खुर्च्या जाळून खाक झाल्या आहेत.

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अद्याप कारण अस्पष्ट असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Intro:Body:

नाशिक न्यूज फ्लॅश

-नाशिकरोड येथील अनुराधा सिनेमगृहाला भीषण आग..

-अनुराधा सिनेमगृह आठ वर्षांन पासून आहे बंद

-अग्नीशमक बंब घटना स्थळी दाखल,आग विझवण्याचे काम सुरू ..

-सिनेमगृह बंद असल्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही,सिनेमगृहचे मात्र आर्थिक नुकसान..

-आगीच नेमकं कारण अस्पष्ट..

Conclusion:
Last Updated : Aug 17, 2019, 1:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.