नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांच्या आदेशानंतर नाशिकमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून मशिदीसमोर हनुमान चालीसा पठण ( MNS Hanuman Chalisa Nashik ) करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिसांनी वेळीच या कार्यकर्त्यांना ताब्यात ( MNS Workers Detained In Nashik ) घेतले. यावेळी मनसे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता.
14 मनसैनिकांना तडीपारीची नोटिसा : नाशिकमध्ये 14 मनसैनिकांना तडीपारीची नोटिसा बजावण्यात आली. तर मशिदीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचां प्रयत्न करणाऱ्या 29 मनसैनिकांना ताब्यात घेण्यात आले. तसंच दोनशे मनसेचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या. जुने नाशिक भागात मशिदीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 8 महिला मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून स्पीकर, वायर आदी साहित्य पोलिसांनी जप्त केलं. तसेच सकाळी मनसे कार्यकर्त्यांकडून शहरातील अनेक हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा म्हणण्यात आली.