नाशिक : मनमाड पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी अनोखी शक्कल लढवली आहे. रात्री 8 वाजेनंतर रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवरच कोव्हिड टेस्ट केली जात आहे. ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्याला थेट कोव्हिड सेंटरमध्ये भरती करण्यात येत आहे. मनमाड पोलीस, आरोग्य विभाग आणि पालिकेकडून संयुक्त कारवाई केली जात आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवरच अँटीजन टेस्ट
राज्यात वाढत असलेल्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे आहे. आवश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास पूर्णपणे बंदी असतानाही काही नागरिक बाहेर फिरताना दिसत येत आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर अंकुश यावे यासाठी मनमाड पोलिस, पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने एक अनोखी शक्कल लढवली आहे. पोलीस ,पालिका आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पथकाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर उभे राहून रस्त्यांवरून जाणाऱ्यांना पकडून ऑन द स्पॉट त्यांची अँटीजन टेस्ट करत असून टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्यांची कोव्हिडमध्ये रवानगी करण्यात येत आहे. तर टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर विनाकारण फिरत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या अनोख्या कारवाईमुळे वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मदत होईल. असे मत मनमाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते आणि पालिका मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे यांनी व्यक्त केले.
अनोख्या मोहिमेचे नागरिकांडून स्वागत
पोलीस आणि पालिका प्रशासनाने सुरू केलेल्या या अनोख्या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले आहे. त्यांनी केलेल्या टेस्टमुळे आम्हाला कळालं की मी निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
हेही वाचा : राज्यात 63 हजार 294 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 349 मृत्यू