ETV Bharat / city

भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांना 'एसीबी'कडून चौकशीसाठी नोटीस

ऐन निवडणूक काळात नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

माणिकराव कोकाटे
author img

By

Published : Apr 9, 2019, 11:49 AM IST

नाशिक - भाजपचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी) कडून नोटीस मिळाली आहे. ऐन निवडणूक काळात नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून माणिकराव कोकाटेंना भाजपकडून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे माणिकराव कोकाटेंनी अपक्ष अर्ज भरत भाजपसोबत बंडखोरी केली होती. माणिकराव कोकाटे सिन्नरचे माजी आमदार आहेत. याआधीही नाशिकच्या भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाली नसल्यामुळे माणिकराव कोकोटे पक्षावर नाराज होते. पक्षाने दादा जाधव यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

माणिकरावांकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता आहे. या आरोपाखाली एसीबीकडून माणिकरावांची चौकशी सुरू आहे. परंतु, आता एसीबीने नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात एसीबीने चौकशीसाठी बोलावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.