ETV Bharat / city

नाशिकमध्ये कोरोना नियमांचे पालन करून शासकीय ध्वजारोहण संपन्न - शासकीय ध्वजारोहण

कोरोना नियमांचे पालन करून महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने 13 एप्रिल 2021 च्या आदेशान्वये करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवत कमीत कमी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे ध्वजारोहण करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये कोरोना नियमांचे पालन करून शासकीय ध्वजारोहण संपन्न

author img

By

Published : May 1, 2021, 11:55 AM IST

नाशिक : महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित नाशिक जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालय पार पडला आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. राज्यावर कोरोनच सावट असल्याने निवडक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहण सोहळा पार पडला.

नाशिकमध्ये कोरोना नियमांचे पालन करून शासकीय ध्वजारोहण संपन्न

सुरक्षित अंतर ठेवत ध्वजारोहण
कोरोना नियमांचे पालन करून महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने 13 एप्रिल 2021 च्या आदेशान्वये करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवत कमीत कमी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे ध्वजारोहण करण्यात आले आहे.

ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस प्रशिक्षण प्रबोधनीच्या संचालक अश्र्वती दोरजे, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.