नाशिक - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट बससेवेला 45 दिवसात 2 कोटींचा तोटा आला आहे. 50 बसेसचा हा तोटा असून भविष्यात जर 250 बसेस रस्त्यावर धावल्या तर होणार तोट्याचा विचार ही करायला नको अशी परिस्थिती येऊ शकते, असे तज्ञ लोकांचे मत आहे.
शिवधनुष्य उचलणे पडले महागात?
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने राज्य परिवहन महामंडळाच्या तोट्यातील बस सेवा सुरू करण्याचे शिवधनुष्य उचलले. मात्र, हा निर्णय अंगलट आल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे ठेकेदाराचे संरक्षण करण्याची पालिकेची भूमिका अडचणीत सापडली आहे. तसेच 1 एप्रिल 2020 नंतर बंदी असलेल्या bs4 या तंत्रज्ञानाच्या बसेस पालिकेच्या माथी पुढील दहा वर्षासाठी मारल्यामुळे सत्ताधारी भाजपचा कारभार समोर आला आहे. तसेच भाजप-शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुतीने देखील या प्रश्नावर शांत राहणं पसंत केलं आहे. काँग्रेस व मनसेनेही बस सेवेला विरोध केल्यामुळे याला आता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
250 बसेसचे काय ?
आता फक्त 50 बसेस सुरू करण्यात आल्या असून त्यात दिवसाला 4 ते 5 लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यातही ही या मुख्य मार्गावर चालत असल्याने काही प्रमाणात का होईना बसेसला उत्पन्न मिळत आहे. मात्र, टप्याटप्याने 250 बस सुरू झाल्यातर तोटा किती होईल हा महत्वाचा मुद्दा आहे.
हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, दोन महिन्यांपासून रखडलेले वेतन मिळणार