ETV Bharat / city

नाशिकमध्ये कॉलेज रोड भागात बिबट्याचा वावर; शहरात दहशत - leopard in nashik

शहराच्या मध्यवर्ती कॉलेज रोड या भागात नागरिकांना सकाळच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालं आहे. या बिबट्याने घरकाम करणाऱ्या एका महिलेला जखमी केलं असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

leopard in nashik
शहराच्या मध्यवर्ती कॉलेज रोड या भागात नागरिकांना सकाळच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालं आहे.
author img

By

Published : May 29, 2020, 12:40 PM IST

नाशिक - शहराच्या मध्यवर्ती कॉलेज रोड या भागात नागरिकांना सकाळच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालं आहे. या बिबट्याने घरकाम करणाऱ्या एका महिलेला जखमी केलं असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शहराच्या मध्यवर्ती कॉलेज रोड या भागात नागरिकांना सकाळच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालं आहे.

कॉलेज रोड हा परिसर शहरातील मुख्य वर्दळीचा भाग आहे. याठिकाणी महाविद्यालयीन कॅम्पस आहेत. तसेच लोकवस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहे.

बिबट्याची बातमी पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप बिबट्या सापडला नसून वनविभागातर्फे शोधमोहिम राबवण्याचे काम सुरू आहे. याचसोबत पोलिसांनी देखील काही प्रमाणात परिसर सील केला आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.