ETV Bharat / city

बाधित व बरे झालेल्या रुग्णांनी म्यूकरमायकोसिसपासून स्वत:ची काळजी घ्या - छगन भुजबळ

author img

By

Published : May 14, 2021, 10:33 PM IST

बाधित व बरे झालेल्या रुग्णांनी म्म्यूकरमायकोसिसपासून स्वत:ची काळजी घ्या, असे आवाहन छनग भुजबळ यांनी केले. ते निफाड व येवला तालुक्यांच्या आढाव बैठकीत बोलत होते.

Infected and cured patients should take care of themselves from mucor mycosis, appeals Chhagan Bhujbal
बाधित व बरे झालेल्या रुग्णांनी म्यूकरमायकोसिसपासून स्वत:ची काळजी घ्या - छगन भुजबळ

येवला (नाशिक) - कोरोनाच्या प्रादुर्भावासोबतच म्यूकरमायकोसिस आजाराचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. याकरता कोरोना बाधित आणि कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी म्यूकरमायकोसिस या आजारापासून स्वत:ची अधिक प्रमाणात काळजी घ्यावी, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. येवला विश्राम गृह येथे सद्यस्थिती उपाययोजना व लसीकरण मोहीम याबाबत निफाड व येवला तालुक्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत भुजबळ बोलत होते.

म्यूकरमायकोसिस बाबत टास्क फोर्सची निर्मिती -

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, की येवला तालुक्यात कान, नाक व घसा तज्ज्ञ नसल्याने म्यूकरमायकोसिसचे बाधित रुग्ण आढळल्यास त्यांना तातडीने नाशिकला उपचारासाठी पाठविण्यात यावे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी व नियोजनपूर्वक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात म्यूकरमायकोसिस बाबत टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. ऑक्सिजनवर जे रुग्ण आहेत अथवा ज्या रुग्णांनी ऑक्सिजनवर उपचार घेतले आहेत, अशा रुग्णांची नियमित तपासणी करण्यात यावी. ऑक्सिजन जनरेशन प्लॅट सुरू झाल्यानंतर ऑक्सिजनच्या तुटवड्याचे प्रमाण कमी होणार आहे, असे पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टिने उपाययोजना करा - भुजबळ

कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याकरीता ब्रेक द चेनच्या अंतर्गत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिसून येत असल्याने लॉकडाऊन नियामांचे काटेकोर पालन करण्यात यावे. याचाच भाग म्हणून शहरी भागातील रुग्णांची संख्या कमी होत असून ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टिने उपाययोजना करण्यात याव्यात. कोरोना संसर्गाचा प्रसार कमी होण्यासाठी आणि गृह विलगीकरणात आवश्यक सुविधा उपलब्ध नसतील अशा बाधित व नव्याने बाधित झालेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी न देता त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे. लासलगाव येथील कोविड सेंटर तातडीने सुरू करण्यात यावे. ४५ वर्षावरील नागरिकांची लसीकरण मोहीम जलद गतीने राबवण्यासाठी नियोजन करण्यात यावे.नगरपालिकेने पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणाना दिल्या आहेत.

येवला शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनची केली पाहणी -

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला शहरात प्रत्यक्ष पाहणी करत लॉकडाऊनचा आढावा घेतला. यावेळी प्रथमतः शनी पटांगण येथील भाजी बाजार परिसर येथून पाहणी सुरूवात करून येवला शहरातील विविध भागातून पाहणी केली. यावेळी शहरात विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

विंचूर येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन -

विंचूर येथील देवकी लॉन्स येथे उभारण्यात आलेल्या 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कोविड केअर सेंटरमध्ये एकूण २५ ऑक्सिजन व २५ साधारण बेडची व्यवस्था करण्यात आलेली असून रुग्णांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.