ETV Bharat / city

नाशिक क्राइम : 20 वर्षांच्या तरुणाकडून गावठी कट्टा आणि काडतुसे हस्तगत - नाशिक क्राइम

मंगळवारी रात्रीच्या सुमारास भद्रकाली पोलिसांनी द्वारका परिसरातून एका २० वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. फिरोज शेख असे संबंधित युवकाचे नाव असून तो वडाळा नाका परिसरातील इगतपुरी चाळीत राहतो.

नाशिक क्राइम
मंगळवारी रात्रीच्या सुमारास भद्रकाली पोलिसांनी द्वारका परिसरातून एका २० वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे.
author img

By

Published : Jul 15, 2020, 6:03 PM IST

नाशिक - मंगळवारी रात्रीच्या सुमारास भद्रकाली पोलिसांनी द्वारका परिसरातून एका २० वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. फिरोज शेख असे संबंधित युवकाचे नाव असून तो वडाळा नाका परिसरातील इगतपुरी चाळीत राहतो.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संबंधित तरुण गावठी कट्ट्याची तस्करी करत होता. यावेळी करण्यात आलेल्या झडतीदरम्यान एक गावठी कट्टा आणि जिवंत कडतुसे असा सुमारे ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

शासनाने लाॉकडाऊन जाहीर केल्यानंतर शहरातील तस्करांनी डोकं वर काढलंय. अनेक दिवसांपासून अवैधरित्या शस्त्र तसेच अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा घटना समोर आल्या आहेत. मात्र याविरोधात शहर पोलिसांनी कंबर कसली असून एका शस्त्र तस्कराला भद्रकाली पोलिसांनी मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अटक केली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी द्वारका परिसरातील चारचाकी वाहनांच्या शोरूमजवळ एक तरुण संशयास्पदरित्या वावरत असल्याचे कळले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या तरुणाने त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली. यामुळे संशय आणखी बळावला. यानंतर पोलिसांनी घेतलेल्या झडतीत त्याचाकडे गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.