नाशिक - इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणी अभिनेत्री हिना पांचाळसह अन्य 11 महिलांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
इगतपुरी परिसरातील रेव्ह पार्टी प्रकरणी 12 महिला आणि सहा पुरुषांना एका दिवसाची तर चार पुरुषांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. दरम्यान उपलब्ध माहितीनुसार ही पार्टी लागोपाठ तीन दिवस चालणार होती. परंतु अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी ही पार्टी उधळून लावल्यामुळे त्यांचा हा डाव फसला आहे.
अभिनेत्री हिनासह १२ महिलांना एक दिवसाची पोलीस कोठडी
इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी २२ जणांना अटक केली होती. पोलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यात एक इराणी कोरिओग्राफर महिला आणि चार साऊथ सिनेमात भूमिका करणाऱ्या अभिनेत्रींचा समावेश आहे. कोरोना नियम उल्लंघन, मद्य सेवन, तंबाखूजन्य पदार्थ यांचे सेवन करताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली होती.
बॉलिवूडचे ड्रग्स कनेक्शन चर्चेत?
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परीसरात दोन बंगल्यांमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती विदेशी मद्यासह ड्रग्ज, कोकेन, चरस, हुक्का यासारखे अंमली पदार्थही पोलिसांच्या हाती लागल्याने बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दरम्यान दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार ही पार्टी तीन दिवस चालणार होती आणि त्यासाठी हे दोन बंगले बुक करण्यात आले होते. तीन दिवस या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते, अशी देखील माहिती समोर आली आहे.
हेही वाचा - पुण्यात कडक निर्बंध, दुपारी ४ नंतर ही दुकाने बंद, जाणून घ्या नवीन नियमावली